शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाशिवाय जलसिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सरदार सरोवराच्या पाण्याचा हत्यार म्हणून वापर करतात़ गुजरात, महाराष्ट्र आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सरदार सरोवराच्या पाण्याचा हत्यार म्हणून वापर करतात़ गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील हजारो आदिवासी बांधवांचे पुनर्वसन न करता जलसिंचन  करण्याच्या धोरणाला नर्मदा बचाव आंदोलन विरोध करत असून यासंदर्भातील चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक तातडीने घेण्यात येणार असल्याने दिलासा मिळाला असल्याचे नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी सांगितल़े  शहादा शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या़ प्रसंगी माहिती देताना त्यांनी सांगितले की, महाकाय अशा सरदार सरोवर प्रकल्पामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील 30 हजार पेक्षा अधिक बाधित कुटुंबे जलसंचयाच्या या धोरणामुळे जगण्याचा हक्क हिरावून बसले आहेत़ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जलसंचयाच्या अधिकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या  वाढदिवसाचे औचित्य साधत सलग दहा तास केलेल्या खर्चिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा जलसिंचन हा जलसंचय सुरू केला़ यामुळे मध्यप्रदेशात सर्वात मोठी हानी झाली आह़े आजघडीस सरदार सरोवर बाधितांचे पुनर्वसन झालेले नाहीत केवळ 830 नागरिकांना लाभ मिळाला आह़े उर्वरित एक हजारापेक्षा अधिक लोक यामध्ये पुनर्वसन प्रक्रियेपासून वंचित आहेत़  मध्य प्रदेश सरकारचा विरोध न जुमानता केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मोठे जनआंदोलन पुन्हा सुरू होणार आह़े नंदुरबारचे  जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी बुडीत क्षेत्राचा दौरा करून योग्य नियोजन करत शासनाकडे पाठपुरावा केले  आह़े महाराष्ट्रातील 33 गावे बाधित क्षेत्रात असल्याने हजारो आदिवासी बाधंवांना पुनर्वसनाचा प्रश्न भेडसावत आह़े मणिबेली, चिमलखेडी, धनखेडी या गावांमध्ये जिल्हाधिका:यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली़  येथील काही लोकांना गुजरात राज्यात देण्यात आलेल्या  जमिनीचा दर्जा अत्यंत खालावलेला असून अजूनही त्यांना जमीन व घराचा सातबारा किंवा ताबा मिळाला नसल्याची माहिती मेधा पाटकर यांनी दिली़