शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

९० हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:03 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधित रुग्ण समोर आल्यानंतर त्याच्या रहिवास परिसराला ‘कंटेन्मेंट झोन’ करत प्रशासन संसर्ग रोखण्याचा प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाबाधित रुग्ण समोर आल्यानंतर त्याच्या रहिवास परिसराला ‘कंटेन्मेंट झोन’ करत प्रशासन संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे़ तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून ७९ कंटेन्मेंट झोनमध्ये ९० हजार नागरिकांचे स्क्रिनिंग झाले आहे़ यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला बऱ्यापैकी येऊन नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे़जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता़ यातून आजअखेरीस २७२ रुग्ण समोर आले आहेत़ यातील १६८ कोरोनामुक्त होवून घरी गेले असले तरी अद्यापही ८१ बाधित कोविड कक्षांमध्ये उपचार घेत आहेत़ या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किमान ५०० पेक्षा अधिक जणांना जिल्ह्यातील १० क्वारंटाईन सेंटर्समध्ये ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते़ यातील ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे आहेत त्यांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली़ तत्पूर्वी रुग्ण काही वेळासाठी संपर्कात आलेल्या परिसराचे काय यावर, मार्ग म्हणून संपूर्ण परिसर बंदीस्त अर्थात कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करत त्याठिकाणी राहणाºया नागरिकांच्या तपासण्या करुन संपर्क साखळी तोडण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता़ प्रारंभी संपूर्ण वॉर्ड किंवा एक गल्ली सिल करुन त्यात राहणाऱ्यांची तपासणी प्रशासनाने केली होती़ कालांतराने रुग्णाचे घर आणि हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांना क्वारंटाईन करुन कंटेन्मेंट झोन केले जात आहेत़ कंटेन्मेंट झोनच्या या जिल्हा मॉडेलमुळे रुग्णांची संख्या बºयाच अंशी कमी ठेवत कोरोनावर अंकुश ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे चित्र तपासणी झालेल्या झोनमधून समोर आले आहे़

४१७ एप्रिल रोजी नंदुरबार शहरात पहिला कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला होता़ यातून ९६४ घरांमध्ये ४ हजार ६३२ नागरिकांची तपासणी झाली़४यानंतर जिल्हाभरात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून येण्यास सुरूवात झाली़ जिल्ह्यात सध्या ५४ कंटेन्मेंट झोन कार्यरत असून ३१ झोन हे संपले आहेत़नंदुरबार शहरात आजअखेरीस २९ अ‍ॅक्टीव्ह झोन आहेत़शहादा शहर व तालुक्यात आजवर १६ झोन करण्यात आले होतेअक्कलकुवा शहरात ६ ठिकाणी कंटेन्मेंट झोन होते़नवापूर तालुक्यात तीऩतळोदा तालुक्यात पाच तर धडगाव तालुक्यात एक ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला होता़जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यातील या ७९ झोनमध्ये २० हजार २७७ घरे तपासली केली गेली़

२० हजार घरांमधून ९१ हजार १९७ नागरिकांची तपासणी करणाऱ्या आरोग्य पथकांनी घरातील प्रत्येकाची स्क्रिनिंग केली़यातून नंदुरबार शहर व तालुक्यात २६ हजार ९८३ जण तपासले गेले़शहादा शहर आणि तालुक्यात तब्बल ५७ हजार ४९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली़तळोदा शहरात ७५६ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले़अक्कलकुवा व मोलगी येथे ४ हजार ५४९ जणांच्या तपासण्या झाल्या़नवापूर तालुका व शहरात ४९३ तर धडगाव येथे ४२ जणांच्या तपासण्या करुन अहवाल देण्यात आला़ यातील कोरोना लक्षणे असलेल्यांना तातडीने क्वारंटाईन केले गेले होते़ या संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक पथक वेळोवेळी कार्यरत होते़ यात आरोग्य सेवक, सहायक, आरोग्य सेविका आणि सहाय्यिका तसेच आशा आणि अंगणवाडी कर्मचारींनाही समाविष्ट करुन गृहभेटींद्वारे कौटूंबिक माहिती व प्रवासी माहिती जाणून घेतली गेली़