ब्राह्मणपुरी अत्याचार घटनेतील अंतरिम जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:08+5:302021-07-04T04:21:08+5:30

शहादा : ब्राह्मणपुरी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या सहा संशयितांना अंतरिम जामीन शहादा न्यायालयाने फेटाळला आहे. ...

Interim bail rejected in Brahmanpuri atrocity case | ब्राह्मणपुरी अत्याचार घटनेतील अंतरिम जामीन फेटाळला

ब्राह्मणपुरी अत्याचार घटनेतील अंतरिम जामीन फेटाळला

शहादा : ब्राह्मणपुरी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या सहा संशयितांना अंतरिम जामीन शहादा न्यायालयाने फेटाळला आहे. ८ जुलैपर्यंत त्यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ब्राह्मणपुरी शिवारात शेती कामासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील एका कुटुंबातील मुलीवर गावातील पंकज मंगा पाटील या युवकाने अत्याचार केला होता. त्यात ती गर्भवती राहिली होती. मुलीचा गर्भपात केला गेला होत्या. पंकज पाटील यास मदत करणाऱ्या इतर सहा जणांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

शहादा अतिरिक्त सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे अंबालाल सुभाष पाटील, शांतिलाल पाटील, प्रेमराज उर्फ भुऱ्या पाटील सर्व रा.ब्राह्मणपुरी ता. शहादा मुमताज उर्फ मुन्नीबाई हसन पठाण रा.तकीया बाजार शहादा, संजय मंगेश पाटील रा.गुजर गल्ली शहादा व चंद्रकांत शिंदे रा.कमरावद यांना ८ जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फिर्यादी पक्षातर्फे ॲड. जगदीश कुवर यांनी काम पाहिले.

दरम्यान, मुख्य संशयित आरोपी अटकेत आहे.

Web Title: Interim bail rejected in Brahmanpuri atrocity case