शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मयत व जखमींना मदतीऐवजी मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील राणीपूर गावात मरीमाता मंदिराजवळ शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मोटारसायकल व अज्ञात चारचाकी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील राणीपूर गावात मरीमाता मंदिराजवळ शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मोटारसायकल व अज्ञात चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. म्हसावद पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जखमींनी संबंधित चारचाकी वाहन चालकाला दवाखान्यात नेण्याची विनंती केली. मात्र जखमींना दवाखान्यात न नेता उलट त्यांना या वाहनातील युवकांनी मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी या वाहनाचा व त्यातील युवकांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.याबाबत माहिती अशी की, शहादा शहरातील कुकडेल भागात राहणारा हर्षल नामदेव जाधव (१९) व त्याचे नातेवाईक धुळे येथील राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचारी भूषण मराठे हे शनिवारी मोटारसायकलीने (क्रमांक एम.एच.१८ डीझेड-७६५२) तोरणमाळ येथून शहाद्याकडे येत होते. राणीपूर गावाकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मरीमाता मंदिरासमोर मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलीवरील हर्षल जाधव याच्या डोक्याला व छातीला मार लागला. या वेळी त्याच्यासोबत असलेले त्याचे नातेवाईक भूषण मराठे यांनी त्या वाहनचालकाला हर्षल यास रुग्णालयात हलवण्याची विनंती केली.मात्र या वाहनातील काही युवकांनी उतरून हर्षल जाधव व भूषण मराठे यांना मारहाण करून त्यांनी तेथून पळ काढला. तास-दीड तास रस्त्यावर कुठलेही वाहन न आल्यामुळे हर्षल जाधव याचा उपचाराअभावी जागीच मृत्यू झाला. सायंकाळी घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन दोघांना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांनी हर्षल जाधव यास मयत घोषित केले.या घटनेसंदर्भात जाधव कुटुंबातील लोकांना व नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. रविवारी सकाळी पोलीस आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मयताचे प्रेत उचलले जाणार नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर एकच प्रश्न निर्माण झाला होता. बºयाच वेळानंतर शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी भ्रमणध्वनीद्वारे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्याशी संपर्क करून घटनेबाबत माहिती घेतली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी मयताच्या नातेवाईकांना आरोपीविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर प्रेत ताब्यात घेऊन दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहादा हर्षलच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.