शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातही शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाने ग्रामिण भागासह आता सातपुड्याच्या दुर्गम भागातही शिरकाव केला आहे. मोलगी येथील संशयीत रुग्णाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाने ग्रामिण भागासह आता सातपुड्याच्या दुर्गम भागातही शिरकाव केला आहे. मोलगी येथील संशयीत रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत तळोदा व धडगाव हे दोन तालुके कोरोनापासून लांब होते आता तळोद्यातही रुग्ण आढळला आहे. दरम्यान, सोमवारी ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात नंदुरबारातील ३, तळोदा, मोलगी व लोणखेडा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. एकुण संख्या आता ६८ झाली आहे.कोरोनाचा फैलाव जिल्ह्यातील सर्वच भागात होऊ लागला आहे. विशेषत: बाहेरून आलेल्या लोकांमुळे हा फैलाव वाढत आहे. गेल्या आठ दिवसात जे नवीन रुग्ण आढळून आले आहेत त्यात सर्वाधिक बाहेरून आलेल्यांची संख्या आहे. त्यांच्या माध्यमातून इतरांना कोरोनाची लागन होत आहे. त्यामुळे संख्या झपाट्याने वाढत आहे. चार दिवसात दररोज किमान दोन ते दहा रुग्ण आढळून येत आहेत.सातपुड्यातही शिरकावकोरोनाने सातपुड्यात देखील शिरकाव केला आहे. मोलगी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाला कोरोनाची सर्व लक्षणे दिसून आल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सोमवारी सायंकाळी अहवाल आल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कालच या रुग्णामध्ये लक्षणे आढळल्याने त्यांच्या संपर्कातील इतरांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते.शिवाय संबधीत भाग देखील सील करण्यात आला आहे. मोलगी येथे दऱ्याखोºयातील ४० ते ४२ गावांचा संपर्क येतो. शिवाय संबधीत व्यक्तीचे गावात खेळणीचे दुकान असल्यामुळे त्यांचा संपर्क आणखी किती जणांशी आला याची माहिती घेतली जात आहे.लोणखेडा, मंदाणे येथेही...लोणखेडा व मंदाणे येथे देखील दोन रुग्ण सापडले आहेत. हे दोन्ही रुग्ण बाहेर गावाहून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कातील ११ लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून ते राहत असलेला भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे. मंदाणे गाव यापूर्वीच तीन दिवस लॉकडाऊन करण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच अनिल भामरे यांनी दिली. लोणखेडा येथील संबधीत रुग्ण राहत असलेल्या भागात देखील आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.बाहेरून आलेल्यांमुळे फैलावबाहेरून आलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. नंदुरबारातील तीन ठिकाणी, तळोदा, मोलगी, लोणेखडा, मंदाणा शिवाय यापूर्वी रजाळे, हिंगणी येथील रुग्ण हे बाहेरगावाहून आलेले होते. त्यामुळे ते व त्यांच्या संपर्कातील इतरांना या साथीला सामोरे जावे लागले आहे. विशेषत: लॉक डाऊन शिथील झाल्यानंतर त्यात वाढ झालेली आहे.त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या लोकांची माहिती घेवून त्यांना आल्या बरोबर क्वॉरंटाईन करणे आवश्यक आहे. त्यांच्या संपर्कात कुटूंबातील कमीत कमी लोकांना येता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. येत्या काळात एस.टी.बस सेवा सुरू झाल्यास त्यात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे यापुढील काळात मोठी जोखीम राहणार असून त्याकरीता प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. प्रशासनातर्फे देखील जनजागृतीवर भर द्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.शहरातील तिघांसह जिल्ह्यातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ नंदुरबार शहरातील जोगेश्वरी नगरात ३५, राजीव गांधी नगरात २९ वर्षीय पुरुष तर बागवान गल्लीतील ७० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे़ तळोदा शहरातील मोठा माळीवाड्यातील ४०, मोलगी ता़ अक्कलकुवा येथील १८ वर्षीय पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ दरम्यान लोणखेडा ता़ शहादा येथील ६७ वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला होता़ त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे़ सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे़ तळोदा शहरात प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला असून ठाणे येथून परतलेल्या वृद्धेचा शनिवारी मृत्यू झाला होता़ कोरोना संसर्ग झालेला ४० वर्षीय पुरुष संबधित महिलेच्या नातेवाईक असल्याची माहिती आहे़