शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

पोल्ट्री उद्योगावर गैरसमजांमुळे संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोशल मिडियातून कोंबडी आणि मासे खाल्ल्याने कोरोनाचा होत असल्याची अफवा सातत्याने प्रसारित होत असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सोशल मिडियातून कोंबडी आणि मासे खाल्ल्याने कोरोनाचा होत असल्याची अफवा सातत्याने प्रसारित होत असल्याने पोल्ट्री उद्योग संकटात सापडला आहे़ परंतू हा निव्वळ गैरसमज असल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला असून त्यांच्याकडूनही जनजागृती सुरु झाली आहे़नवापुर शहर व परिसरात २४ नोंदणीकृत पोल्टी उद्योग आहेत़ यातील बहुतांश पोल्ट्री ह्या अंडी उत्पादन करुन त्याची विक्री करतात़ नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागात १०० च्या जवळपास पोल्ट्री आणि हॅचरीज आहेत़ या सर्वच ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने गेल्या आठवड्यात तपासणी केली होती़ २०१९ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ४ लाख ९० हजार १९० कोंबड्या आहेत़ या सर्व कोंबड्या सुस्थितीत असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे़ पशुसंवर्धन विभागाने परवाने दिल्यानंतर सुरु झालेल्या पोल्ट्री उद्योगातून बेरोजगार युवकांना मोठा रोजगार मिळाला आहे़ दिवसातून जिल्ह्यात १० हजारपेक्षा अधिक पक्ष्यांची विक्री होत असल्याने उद्योग तेजीत आहे़ परंतू गेल्या महिन्यापासून कोरोना विषाणू कोंबडी खाल्ल्याने शरीरात जाणार असे संदेश सोशल मिडियातून सुरु झाले होते़ यातून या व्यवसायावर संक्रांत आल्याचे चित्र सध्या बाजारात आहे़ परंतू चिकन खाल्ल्याने कोणासही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले नसल्याने सोशल मिडियातून फिरणारे संदेश हे खोटे असल्याने विभागाने कळवले आहे़शनिवार आणि रविवारी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांनी पोल्ट्री व्यावसायिकांच्या भेटी घेत तपासणी केली होती़ परंतू आक्षेपार्ह असे काहीही आढळून आलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे़ सर्वच कोंबड्या सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले असून स्वच्छता राखण्याच्या सूचना व्यावसायिकांना करण्यात आल्या आहेत़याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ उमेश पाटील यांच्याकडून माहिती घेतली असता, त्यांनी सांगितले की, कोंबडी ही संपूर्णपणे शिजवून खाण्याची पद्धत आपल्याकडे रुढ आहे़ यामुळे कोंबडीचे मटन हे संपूर्णपणे सुरक्षित आहे़ सोबत मासे खाल्ल्याने कोरोनाची लागण होतो हे अफवा आहे़ नागरिकांनी सोशल मिडियातून येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये़ दरम्यान पोल्ट्री व्यावसायिकांच्या तपासणी कार्यक्रम पुढील आठवड्यातही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ तालुकास्तरावर पशुवैद्यकीय अधिकारी वेळोवेळी पोल्ट्री व्यावसायिकांसोबत संपर्क करुन माहिती देणार आहेत़