शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

७० जणांच्या चलबिचलतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रयोगशाळेतून अहवाल येत नाही आणि दुसरीकडे क्वॉरंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रयोगशाळेतून अहवाल येत नाही आणि दुसरीकडे क्वॉरंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या मनातील चलबिचलता वाढत आहे. शुक्रवारी घेतलेले ४२ स्वॅब आणि शनिवारी घेतलेले २८ स्वॅब असे एकुण ७० अहवालांची प्रतिक्षा लागून आहे. यात रजाळे, नंदुरबार, कन्साई येथील रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या स्वॅब अहवालांचा देखील समावेश आहे.
नंदुरबारातील कोरोनाग्रस्त सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतलेले असतांना मुंबई रिटर्न कुटूंबाने जिल्ह्यात पुन्हा कोरनाचा शिरकाव केला. त्यातच सिव्हीलच्या दोन कर्मचाºयांना देखील त्याची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात झाला. आढळून आलेल्या नऊ रुग्णांपैकी सात रुग्ण हे मुंबई रिटर्न आहेत. त्यामुळे मुंबईचा कोरोना जिल्ह्यात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. प्रलंबीत अहवालातून आणखी कितीजण पॉझिटिव्ह निघतात किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे.
अहवालांची संख्या वाढली
शुक्रवारी कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ४२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा असतांना आणखी २८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामुळे एकुण संख्या आता ७० झाली आहे. काहीजण भितीपोटी देखील तपासणीसाठी येत असून स्वॅब घेण्याचा आग्रह करीत आहेत. परंतु कुठलेही लक्षणे नसतांना स्वॅब घेवून संख्या वाढविण्यापेक्षा अशा व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे.
नऊ पैकी सात मुंबई रिटर्न
कोरोनामुक्तीनंतर जिल्ह्यात आढळून आलेल्या नऊ रुग्णांपैकी सात रुग्ण हे मुंबई रिटर्न आहेत. दोन रुग्ण हे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आहेत. मुंबई रिटर्न आलल्यांमध्ये रजाळे, ता.नंदुरबार येथील सहाजण तर मुळचे दत्तवायपूर, ता.शिंदखेडा येथील एकाचा समावेश आहे. दत्तवायपूर येथील रुग्ण मुंबई येथून आल्यावर गावी थांबला, तेथून शहादा तालुक्यातील कन्साई गावी नातेवाईकांकडे गेला.
त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्थानिक ठिकाणी डॉक्टरांकडे तपासणी केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले. संबधीत कन्साई येथे थांबल्याने प्रशासनाने कन्साई गावात देखील उपाययोजना केल्या आहेत.
रजाळे येथील रुग्ण देखील मुंबई येथून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कातील ते स्वत: सहाजण पॉझिटिव्ह आढळले असून संपर्कातील इतरांचे अहवाल येण्याची प्रतिक्षा आहे. शनिवारी रात्री उशीरा किंवा रविवारी हे अहवाल येणार आहेत. त्यांच्या संपर्कातील अनेकांना आधीच क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. काहींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
सिव्हीलमध्ये दक्षता
सिव्हीलमधील कर्मचाºयांच्या स्वॅबची संख्या देखील वाढविली आहे. दोन रुग्ण रुग्णालयात आढळल्याने ही दक्षता घेतली जात आहे. कर्मचाºयांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कर्मचाºयांना हातमोजे व मास्क पुरविले जात आहे. येत्या काळात अधीक लागण्याची शक्यता लक्षात घेता मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

नवापूर : शहराच्या गुजरात वेशीवर कोरोनाने धडक दिल्याने नवापूर शहराची धकधक वाढली आहे. उच्छल येथील २४ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. गोमतीपूर (अहमदाबाद) येथून १८ मे रोजी शहरालगतच्या हनुमानफळी उच्छल येथील २४ वर्षीय महिला परतली होती. सावधगिरीचा पवित्रा म्हणून महिलेस घरातच होम क्वॉरंटाईन करण्यात येऊन आरोग्य तपासणी केली जात होती. २२ मे रोजी तापाची लक्षणे दिसून आल्याने महिलेचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल प्राप्त होताच सायंकाळी सहा वाजता तातडीने महिलेस तापी जिल्ह्याच्या मुख्यालयी व्यारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. शहराजवळ रेल्वेस्थानक वसाहतीला लागून उच्छल व त्याचे पाडे आहेत. हनुमानफळी असाच एक भाग आहे. महामार्गाच्या एका बाजूला हनुमानफळी असून त्याच्यासमोरील भागात करंजी खुर्द ग्रामपंचायतीअंतर्गत वाकीपाडा येथील वस्ती असून या प्रकारामुळे तेथील लोकांनी हनुमानफळी व वाकीपाडा दरम्यानचा रस्ता सील केला आहे. महिलेस एक वर्षीय बालक असून त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. महिलेचा अहवाल येताच उच्छल येथील वैद्यकीय यंत्रणा लागलीच कामाला लागली आहे. औषध फवारणी करुन महिलेच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. शहरातील रेल्वेस्थानक भागास लागून हा भाग असल्याने स्थानिक प्रशासनाकडूनही घटनेची दखल घेत आवश्यक पावले उचलली जात आहेत.