नंदुरबार : कोळदा ते प्रकाशा दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपुर्ण असल्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी देखील ऊसाने भरलेली ट्रॉली उलटल्याने वाहतूक ठप्प झाली होती.रस्त्याचे काम ठिकठिकाणी अपुर्ण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रविवारी दुपारी ऊसाने भरलेली ट्रॉली उलटली. परिणामी आधीच एकेरी मार्ग असलेल्या रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}