शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सुरत-भुसावळ पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  रोजगार कमावण्यासाठी गुजरात राज्यात स्थायिक झालेल्या कामगारांना वाहून नेणारी सुरत-भुसावळ पॅसेंजर गेल्या आठ महिन्यांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  रोजगार कमावण्यासाठी गुजरात राज्यात स्थायिक झालेल्या कामगारांना वाहून नेणारी सुरत-भुसावळ पॅसेंजर गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे गुजरातमधून महाराष्ट्रात येणा-या प्रवाशांना बसेसमधून प्रवास करावा लागत आहे.                उधना-जळगाव रेल्वेमार्गामुळे खान्देशासह विदर्भ आणि उत्तर भारतातील लाखो कामगार, मजूर व नोकरदार गुजरातमधील मोठ्या शहरात स्थिरावले आहेत. परंतू वर्षात किमान एकदा तसेच विविध सण, समारंभ आणि विवाह सोहळ्यांसह दु:खद प्रसंगाने हे नागरीक मूळ गावाकडे नक्की येतात. यासाठी त्यांना सुरत-भुसावळ या पॅसेंजर गाडीचा सर्वात मोठा आधार होता. यामुळे पॅसेंजर गाड्यांना वर्षभर गर्दी राहत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चनंतर या गाड्या बंद आहेत. कधी सुरू होणार याबाबत रेल्वेकडून माहिती देण्यात आलेली नसल्याने प्रवाशांचे हाल पुढेही सुरू राहणार आहेत. 

खान्देश एक्सप्रेस बंद           भुसावळ ते बांद्रा टर्मिनस असा प्रवास करणारी खान्देश एक्सप्रेसही बंद आहे. यातून मुंबई येथे जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरीकांना रस्ता मार्गाने प्रवास करावा लागत आहेत. सोबतच अमरावती-सुरत पॅसेंजर बंद असल्याने विदर्भातून प्रवास करणा-यांचे हाल होत आहेत. 

सुरत-भुसावळ पॅसेंजरला सर्वाधिक पसंती                भुसावळ ते सुरत दरम्यान दिवसभरात आठ पॅसेंजर गाड्यांच्या फे-या होत होत्या. यातील प्रत्येक फेरीत प्रवाशांची गर्दी कायम होती. आठ महिन्यापासून या फे-या बंद असल्याने सुरत हून खान्देशात येणारे खाजगी वाहने व बसेसचा आधार घेत आहेत. 

गोरगरीबांना मोठा आर्थिक फटका              पॅसेंजर गाडीचे तिकीटाचे दर एसटी किंवा खाजगी वाहनापेक्षा अल्प आहेत. यातून त्यांचा कुटूंबासह गावापर्यंतचा प्रवास कमी खर्चात होत होता. परंतू पॅसेंजर गाड्या बंद असल्याने त्यांना जादा दराने तिकीटे काढून विशेष हिवाळी गाड्या आणि एसटीने प्रवास करावा लागत आहे. यातून त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

राज्य व केंद्र सरकारने पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी समन्वयाची भूमिका घेणे गरजेचे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत्या वर्षात याबाबत निर्णय घेवू शकतात.    गजेंद्र शिंपी, अध्यक्ष, प्रवासी संघटना