शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

लोणखेड्यात साखर शाळेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : साखर कारखाना गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर ऊसतोड कामगारांचे मुले शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : साखर कारखाना गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर ऊसतोड कामगारांचे मुले शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी १९७२ पासून स्व.पी.के.अण्णांनी साखर शाळा सुरू करण्याचा पायंडा सुरू केला. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करीत यंदाच्या हंगामात लोणखेडा गटातील साखर शाळेचा प्रारंभ करण्यात येत आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी केले.कारखान्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत लोणखेडा गटातील साखर शाळेचा शुभारंभ लोणखेडा येथील सातपुडा विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक पी. आर. पाटील होते . याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील, कामगार अधिकारी पुरूषोत्तम मधुकर पाटील, सुरक्षा अधिकारी भरतगीर गोसावी, मायाबाई गुरव उपस्थित होते. पाटील म्हणाले की, ऊसतोड कामगाराचा मुलगा शिकला पाहीजे गाळप हंगामात आई-वडील ऊसतोडीसाठी कारखाना कार्यक्षेत्रात किमान चार ते सहा महिने थांबतात. या दरम्यान कामगारांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, ते शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व संचालक मंडळाने साखर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.या शाळांमधून त्यांना शिक्षणासह माध्यान्ह भोजन, शैक्षणिक साहीत्याचे वाटप केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढते व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही. या वेळी पी.जी. पाटील मुख्याध्यापक यांनी ही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी केले.