शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण अशा आरटी-पीसीआर लॅबसह महिला रूग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्याहस्ते झाले़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण अशा आरटी-पीसीआर लॅबसह महिला रूग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्याहस्ते झाले़ स्वातंत्र्यदिनी हा कार्यक्रम पार पडला़यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार शिरीषकुमार नाईक, आमदार राजेश पाडवी, जि.प.उपाध्यक्ष अ‍ॅड. राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, माजी मंत्री पद्माकर वळवी, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते.कार्यक्रमात अ‍ॅड. पाडवी यांनी महिला रुग्णालयाचे काम कोविडच्या पार्श्वभूमीवर वेगाने पूर्ण केले आहे. आरटीपीसीआर लॅबमध्ये आधुनिक यंत्रणा असून कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक स्वॅब चाचणी कमी वेळेत करणे सुलभ होणार असल्याची माहिती दिली़खासदार डॉ.हीना गावीत यांनी माता मृत्यूदर आणि कुपोषण कमी करण्यासाठी महिला रुग्णालय महत्वाचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी आरटी-पीसीआर लॅब आणि कोविड हॉस्पीटल उपयुक्त ठरेल असे सांगून जिल्हा आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामाचे कौतूक केले़ सूत्रसंचालन डॉ़ राजेश वसावे यांनी केले़ आरटीपीसीआरमुळे एका दिवसात १ हजार २०० स्वॅबची चाचणी होणार आहे़ नाशिक विभागात सर्वात चांगली यंत्रसामुग्री जिल्ह्याला प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ महिला रुग्णालयाच्या वरच्या मजल्याचे कामही करुन ते परीपूर्ण हॉस्पीटल करण्याचा प्रयत्न येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी कार्यक्रमात सांगितले़ धडगाव,अक्कलकुवा तालुक्यात वैद्यकीय सुविधाचा विकास करण्यासह दुर्गम भागात ब्लॅड स्टोअरेज युनिट उभारण्यात येईल. महिला रुग्णालयाच्या ठिकाणी आॅक्सीजन युनिट उभारण्यात येईल अशी माहितीही पालकमंत्र्यांकडून देण्यात आली़