जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 12:59 IST2020-08-17T12:59:42+5:302020-08-17T12:59:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण अशा आरटी-पीसीआर लॅबसह महिला रूग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्याहस्ते झाले़ ...

Inauguration of RTPCR Lab at District Hospital | जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबचे उद्घाटन

जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबचे उद्घाटन


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण अशा आरटी-पीसीआर लॅबसह महिला रूग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्याहस्ते झाले़ स्वातंत्र्यदिनी हा कार्यक्रम पार पडला़
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार शिरीषकुमार नाईक, आमदार राजेश पाडवी, जि.प.उपाध्यक्ष अ‍ॅड. राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, माजी मंत्री पद्माकर वळवी, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात अ‍ॅड. पाडवी यांनी महिला रुग्णालयाचे काम कोविडच्या पार्श्वभूमीवर वेगाने पूर्ण केले आहे. आरटीपीसीआर लॅबमध्ये आधुनिक यंत्रणा असून कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक स्वॅब चाचणी कमी वेळेत करणे सुलभ होणार असल्याची माहिती दिली़
खासदार डॉ.हीना गावीत यांनी माता मृत्यूदर आणि कुपोषण कमी करण्यासाठी महिला रुग्णालय महत्वाचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी आरटी-पीसीआर लॅब आणि कोविड हॉस्पीटल उपयुक्त ठरेल असे सांगून जिल्हा आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामाचे कौतूक केले़ सूत्रसंचालन डॉ़ राजेश वसावे यांनी केले़ आरटीपीसीआरमुळे एका दिवसात १ हजार २०० स्वॅबची चाचणी होणार आहे़ नाशिक विभागात सर्वात चांगली यंत्रसामुग्री जिल्ह्याला प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ महिला रुग्णालयाच्या वरच्या मजल्याचे कामही करुन ते परीपूर्ण हॉस्पीटल करण्याचा प्रयत्न येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी कार्यक्रमात सांगितले़ धडगाव,अक्कलकुवा तालुक्यात वैद्यकीय सुविधाचा विकास करण्यासह दुर्गम भागात ब्लॅड स्टोअरेज युनिट उभारण्यात येईल. महिला रुग्णालयाच्या ठिकाणी आॅक्सीजन युनिट उभारण्यात येईल अशी माहितीही पालकमंत्र्यांकडून देण्यात आली़

Web Title: Inauguration of RTPCR Lab at District Hospital