शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवी इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

ग्रामस्थांनी हे आरोग्य केंद्र त्वरित नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी केली आहे. या इमारतीच्या पाहणीसाठी अनेक लोकप्रतिनिधी व जिल्हा ...

ग्रामस्थांनी हे आरोग्य केंद्र त्वरित नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी केली आहे. या इमारतीच्या पाहणीसाठी अनेक लोकप्रतिनिधी व जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे. मात्र कामकाज पूर्ण होऊनही इमारत का ताब्यात देण्यात आली नाही, असा जाब कोणीच कोणाला विचारायला तयार होताना दिसून येत नाहीत.

दोन वर्षांपासून या इमारतीचे वेगात काम सुरू होते. जवळपास ९० टक्के काम झाले असून, थोडेच काम अपूर्ण असून, त्याकरिता इमारत उद्घाटनाला कोणाची प्रतीक्षा केली जात? आहे की मुहूर्त सापडत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात? आहे. वडाळी गावाच्या मुख्य रस्त्याला लागून असलेल्या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागी तत्कालीन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपालसिंग रावल यांच्या हस्ते २४ जून २०१९ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभाग अंतर्गत एक कोटी ७० लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र पेंढारकर आणि पंचायत समिती सदस्य गिरीश जगताप तसेच बहुसंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या अवाढव्य इमारतीचे बांधकाम ‘साई कन्स्ट्रक्शन’ला देण्यात आले. मात्र या इमारतीचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असून, इमारतीचे बांधकाम लवकर व्हावे व ती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी आहे. कारण हे आरोग्य केंद्र सध्या एका पडक्या खोलीत सुरू असून, त्याठिकाणी सुविधाचा अभाव आहे.

वडाळी गावचा विचार करता हे लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. त्याचप्रमाणे परिसरातील १६ ते १७ खेड्यांचा थेट संबंध या गावाशी येतो. या आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्र असून, एक कोंढावळ येथे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर आरोग्य केंद्राच्या सभोवताली संरक्षक भिंतीचेसुद्धा काम करणे आवश्यक आहे. इमारत अंतर्गत खोल्या, अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. त्यांचेदेखील नूतनीकरण यानिमित्त झाले पाहिजे. परंतु अद्याप ही इमारतच पूर्ण झाली नसून, खोल्यांचा प्रश्न प्रस्तावित आहे. या इमारतीचे काम लवकरात लवकर होण्याची आशा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्र आहेत. त्यामुळे यातील कर्मचारी संख्या कमी असून, याचा ताण रुग्णांच्या संख्येवर पडत आहे. या आरोग्य केंद्रात औषधनिर्माता, बाह्यरुग्ण आरोग्य सेविका, उपकेंद्र आरोग्य सेविका, शिपाई, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक आदी पदे रिक्त असून, ती तत्काळ भरण्यात यावीत. तसेच काकर्दा, तोरखेडा, फेस, जयनगर, वडाळी, कुकावल, बामखेडा आदी उपकेंद्रातीलही पदे रिक्त आहेत. तीदेखील भरण्यात यावीत व इमारतीच्या प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.