शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाच्या स्वामित्व दरात सुधारणा; नवीन दर लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता ६०० ...

बांधकाम साहित्य म्हणून वापरण्यात येणारा चुना तयार करण्यासाठी भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी चुनखडी व शिंपल्यापासून केलेल्या चुन्याचा दर आता ६०० रुपये प्रतिब्रास असणार आहे. उत्खननाद्वारे किंवा गोळा करून काढलेले सर्व दगड आणि दगडाच्या भुकटीचा दरदेखील तेवढाच असणार आहे.

बांधकामासाठी वापरण्यात येणारा जांभा दगडाचा (लॅटराइट स्टोन) दर १५० रुपये प्रतिब्रास, उत्खननाद्वारे काढलेले किंवा गोळा केलेले गोटे, बारीक खडी, मुरूम, कंकर यांचा दर ६०० रुपये प्रतिब्रास आणि केवळ बॉलमिल्सच्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येणारे चॅल्सेडोनी खडे यांचा दर तीन हजार रुपये प्रतिब्रास असणार आहे.

सिरामिक किंवा मृतिकाशिल्पे तयार करण्याच्या प्रयोजनार्थ, धातुशास्त्रीय प्रयोजनार्थ, दृष्टीविषयक प्रयोजनार्थ, कोळसा खाणीमध्ये साठवून ठेवण्याच्या प्रयोजनार्थ, सिल्व्हीक्रेट सिमेंट तयार करण्यासाठी आणि मातीची भांडी आणि काच सामान तयार करण्यासाठी वापरण्यात न येणाऱ्या सर्वसामान्य वाळूचा दर १२०० रुपये प्रतिब्रास, तर मुंबई महानगर प्रदेश क्षेत् रवगळून इतर क्षेत्रांकरिता ६०० रुपये प्रतिब्रास असणार आहे.

कौले (मंगलोरी किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनाची) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी चिकण माती, अंतर्गत बंधारे, रस्ते, लोहमार्ग आणि इमारती यांचे बांधकाम करताना भरणा करण्यासाठी/भूपृष्ठ सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारी साधी माती, बांधकामाचे साहित्य म्हणून वापरण्यात येते त्यावेळी पाटीचा दगड किंवा नरम खडक या सर्वांचा दर ६०० रुपये प्रतिब्रास असणार आहे.

विटा तयार करण्याच्या आणि इतर प्रयोजनासाठी वापरण्यात येणारी साधी माती, गाळ आणि सर्व प्रकारची चिकण माती आदी याचा दर २४० रुपये प्रतिब्रास असणार आहे. फुलरची माती किंवा बेटोनाइट याचा दर दीड हजार रुपये प्रतिब्रास असेल. सजावटीच्या प्रयोजनासाठी वापरावयाचे इतर सर्व प्रकारच्या दगडाचा (ग्रॅनाइट वगळून) दर तीन हजार रुपये प्रतिब्रास असेल.

इतर सर्व गौण खनिज (ग्रॅनाइट वगळून) आणि केंद्र शासन घोषित दर ६०० रुपये प्रतिब्रास असेल. गौण खनिजांचे ठोकबंद भाडे (ग्रॅनाइट वगळून आणि केंद्र शासनाने दिनांक १० फेब्रुवारी २०१५ अन्वये घोषित केलेली गौण खनिजे वगळून) दर नऊ हजार प्रतिहेक्टर किंवा त्याच्या भागासाठी असेल, असे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.