शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पिडीत महिलांसाठी ‘भरोसा सेल’ कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संकटात सापडलेल्या पिडीत महिलांना पोलिसांची मदत, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ञाचे मार्गदर्शन, विधीतज्ञाचा सल्ला, सरंक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संकटात सापडलेल्या पिडीत महिलांना पोलिसांची मदत, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ञाचे मार्गदर्शन, विधीतज्ञाचा सल्ला, सरंक्षण अधिकारी व पुर्नवसन या सर्व प्रकारचे सहाय्य एकाच ठिकाणी मिळवून देण्याकरीता बहुउद्देशीय भरोसा सेल अर्थात महिला सहाय्य कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून त्याचा शुभारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयात रविवारी करण्यात आला.आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे कौटुंबिक कलह/कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसुन येते. त्यामुळे अनेकांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आल्याचे उदाहरणे आहेत. याचा विपरीत परीणाम विवाहित दांम्पत्याच्या वैयक्तिक जीवनासोबतच त्यांच्या पाल्यांवर सुध्दा होतो. दिवसेदिवस ही समस्या गंभीर स्वरुप धारण करीत आहे. परिणामी कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत आहे. कौटुंबिक वादाच्या तक्रारींमध्ये पोलीस विभाग व त्यांच्याशी संलग्न समुपदेशन केंद्र यांच्यामार्फत वेळीच योग्य मार्गदर्शन, प्रभावी समुपदेशन मानसिक आधार मिळाल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या वेळीच सोडवल्या गेल्या आहेत.त्याच अनुषंगाने पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या संकल्पनेतुन पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते व पुढाकाराने भरोसा सेलचे उद्घाटन करण्यात आले. भरोसा सेलमध्ये संकटात सापडलेल्या पिडीत महिलांना सर्व प्रकारचे सहाय्य एकाच ठिकाणी मिळवून देण्यात येईल.शाळा व महाविद्यालयाच्या ठिकाणी बऱ्याचदा तरुणींना छेडछाड, दादागिरी, रॅगींग अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. स्मार्ट फोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत काही वेळा सायबर गुन्ह्यांचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगामध्ये विद्यार्थी-विद्याथीर्नींना संकटकाळात कायदेशीर मदत करण्यासाठी पोलीसांशी तात्काळ संपर्क साधुन मदत मिळावी यासाठी पोलीस काका/पोलीस दिदी या उपक्रमाची देखील सुरुवात करण्यात आली. फक्त संकट काळातच पोलीस काका ही संकल्पना राबविण्यात येणार नसुन तर शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी भेटी देवुन विद्यार्थ्यांशी हितगुज करुन वेगवेगळ्या विषयांबद्दल मार्गदर्शन केले जाईल.त्याचप्रकारे आजच्या आधुनिक युगात महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तव्य पार पाडत असतात. पण आपले कर्तव्य पार पाडत असतांना महिलांना सुरक्षित व निर्भय वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास प्रतिसाद म्हणून ‘बडी कॉप’ हा नाविण्यपुर्ण उपक्रम देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेला आहे. बडी म्हणजे मित्र व कॉप म्हणजे पोलीस की जो महिलांच्या सुरक्षेसाठी, अतितातडीच्या प्रसंगी २४ तास उपलब्ध होईल.सदर भरोसा सेल अर्थात महिला सहाय्य कक्ष हे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या अधिपत्याखाली कार्यान्वीत राहणार असुन त्यात महिला सहा.पोलीस निरीक्षक नयना देवरे, सहा.पोलीस उप-निरीक्षक रचना शिंदे, पोलीस हवालदार विजया बोराडे, प्रमिला वळवी, सुमन पावरा हे काम पाहणार आहेत.४भरोसा सेल, पोलीस काका/दिदी, बड़ी कॉप येथे तक्रारी स्विकारण्याकरीता सद्या हेल्पलाईन नंबर म्हणून पूर्वीचेच अस्तित्वात असलेले १०० व ०२५६४-२१०१००/ २१०११३ असे कार्यान्वीत करण्यात आलेले आहे, परंतु लवकरच तिन्ही योजनांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत करण्यात येतील. त्यांची प्रसिद्ध लवकरच केली जाईल असेही पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी जाहीर केले.