खांडबारा येथे बेकायदा देशी दारू विक्री करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:28+5:302021-07-07T04:37:28+5:30

खांडबारा गावातील कुंभार गल्लीत संजय रतिलाल कुंभार हा किराणा दुकानाच्या आडोशाला देशी दारू, विदेशी दारू व बीयरची ...

Illegal liquor dealer arrested at Khandbara | खांडबारा येथे बेकायदा देशी दारू विक्री करणाऱ्यास अटक

खांडबारा येथे बेकायदा देशी दारू विक्री करणाऱ्यास अटक

खांडबारा गावातील कुंभार गल्लीत संजय रतिलाल कुंभार हा किराणा दुकानाच्या आडोशाला देशी दारू, विदेशी दारू व बीयरची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विसरवाडी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी पोलीस पथकासह या ठिकाणी रविवारी छापा टाकला. या ठिकाणी संजय रतिलाल कुंभार हा दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बसला असल्याचे दिसून आले होते. यातून त्याच्याकडून माल ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. संशयिताकडून ११ हजार ४३२ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खांडबारा परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल भूषण साहेबराव चित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित संजय कुंभार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल अरुण कोकणी व सुरेश चौरे करीत आहेत.

Web Title: Illegal liquor dealer arrested at Khandbara