शहादा येथे १२ लाख रुपयांचा अवैध गुटका जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST2021-02-05T08:08:20+5:302021-02-05T08:08:20+5:30

शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांची माहिती तसेच नंदुरबार पोलीस अभिलेखावरील फरार आरोपींचा शोध घेत असताना ...

Illegal gutka worth Rs 12 lakh seized at Shahada | शहादा येथे १२ लाख रुपयांचा अवैध गुटका जप्त

शहादा येथे १२ लाख रुपयांचा अवैध गुटका जप्त

शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांची माहिती तसेच नंदुरबार पोलीस अभिलेखावरील फरार आरोपींचा शोध घेत असताना एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला पाठवून शहादा-दोंडाईचा रस्त्यावर सापळा रचला होता. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रिलायन्स पेट्रोलपंप परिसरातून एमएच ०५ आर ७८४७ हे वाहन आले असता, त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार समाेर आला. हा गुटखा गुजरात राज्यातील निझर मार्गाने आणला जात होता. वाहनातून १२ लाख ९ हजार ४७२ रुपयांचा गुटका जप्त करण्यात आला. ही कारवाई एलसीबीचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गोरे, किरण पावरा, विकास कापुरे, विजय देवरे, पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख यांनी केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विकास अजगे यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक मंगल रघुनाथ कोळी, रा. महादेवपुरा, दोंडाईचा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून १२ लाख रुपयांचा गुटखा आणि पाच लाखांचे वाहन असा तब्बन १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमुळे गुजरातमधून चोरटी वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: Illegal gutka worth Rs 12 lakh seized at Shahada