शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

नंदुरबार : जिल्ह्यात चार लाखांच्या जवळपास कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस नागरिकांना दिले गेले आहेत. एकीकडे लसीकरणाची गाडी वेगाने धावत ...

नंदुरबार : जिल्ह्यात चार लाखांच्या जवळपास कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस नागरिकांना दिले गेले आहेत. एकीकडे लसीकरणाची गाडी वेगाने धावत असताना काहींना मात्र अडचणी येत आहेत. यात प्रामुख्याने पहिल्या डोसचे प्रमाणपत्र नसल्यावर दुसरा डोस कसा घ्यावा, अशी विचारणा करणारे अधिक आहेत. ऑनलाइन कारभार असल्याने पहिल्या डोसची नोंद मिळून दुसरा डोस मिळणे सोपे झाले आहे.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ऑनलाइन पद्धतीने नोंदण्या करण्यात येत होत्या. दरम्यान, प्रशासनाने ५० टक्के नोंदण्या ह्या थेट केंद्रांवर जाऊन करण्यास मुभा दिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रश्न मिटला होता. परंतु पहिला डोस घेतलेल्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना मोबाइलवर प्रमाणपत्र डाऊनलोड न करता आल्याने अडचणी आल्या आहेत. यातून दुसरा डोस कसा घ्यावा, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. परंतु आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार केंद्रावर जाऊन माहिती दिल्यास ऑनलाइन पडताळणी करून दुसरा डोस देणे शक्य आहे.

मोबाइल क्रमांकामुळे गोंधळ उडाला

पहिला डोस घेताना दिलेल्या मोबाइल क्रमांकावरून प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु ते झालेच नाही. मोबाइलवर मेसेजही दिलेला आहे. ऑनलाइन अर्ज भरताना क्रमांक चुकीचा दिला गेल्यामुळे गाेंधळ झाल्याने अडचणी आल्या.

- सान्या पाडवी, अक्कलकुवा,

दुर्गम भागात मोबाइल कनेक्टिव्हिटीच्या अडचणी आहेत. यामुळे अनेक जणांना नोंदणी करूनही प्रमाणपत्र मिळू शकले नाही. आरोग्य विभागाकडून पावती दिली गेली आहे. परंतु ही पावती हरवल्याचे अनेक जण सांगत आहेत. यामुळे दुसरा डोस कसा घ्यावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-सरदारसिंग पाडवी, अक्कलकुवा,

नोंदण्या असल्याने अडचणी येत नाहीत.

ॲपवर नोंदण्या करण्यात आल्या आहेत. यातून एखाद्या नागरिकाचे प्रमाणपत्र न मिळाल्यास त्यांनी केंद्रात जाऊन माहिती द्यावी, त्याठिकाणी काम करणारे संगणक तज्ज्ञ माहिती घेऊन मदत करतात.

- डाॅ. एन.डी. बोडके,

जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा डोसचे काय, असा प्रश्न असला तरी प्रत्येक डोसची ऑनलाइन नोंद होत आहे. यामुळे कोविन ॲपवर नागरिकाचे नाव टाकून पहिला डाेस कधी घेतला, बॅच क्रमांक काय यासह इतर बाबींची माहिती मिळते. यातून पहिल्या व दुसऱ्या डाेसमधील अंतर समजून घेत पुढील निर्णय घेतला जातो. कोविन ॲपवर सर्व माहिती असल्याने अडचणी येत नसल्याचे सांगण्यात आले.

लसीकरणावेळी ही घ्या काळजी

कोरोना होऊन बरे झालेल्या नागरिकांनी तीन महिन्यांनी लसीचा डोस घेतला पाहिजे.

लस घेण्यासाठी जाताना योग्य तो आहार घेतला पाहिजे.

कोरोनाची लक्षणे, ताप किंवा इतर काही आजारपण असल्यास सल्ला घेऊन लस घेतली पाहिजे.