शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी चित्ररथाद्वारे स्वच्छतेविषक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध योजनांचे संदेश एलईडी चित्ररथाद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध योजनांचे संदेश एलईडी चित्ररथाद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन रथ उपलब्ध करून देण्यात आले असून त्यांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्षा सीमा वळवी व उपाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. त्याच अनुषगाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यासाठी दोन एलईडी रथ पुरविण्यात आले आहेत. त्यांचा शुभारंभ आज करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी.टी.बडगुजर आदींसह सर्व विभागप्रमुख व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.शासनातर्फे देण्यात आलेल्या दोन्ही रथ हे जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायती मध्ये जाऊन पाणी व स्वच्छता या विषयी असलेल्या विविध व्हिडियो फिल्म ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी यांना दाखविण्यात येतील. ग्रामीण भागात स्वच्छतेविषयक जाणीवजागृती करण्यात येणार आहे. यामुळे ज्या ग्रामपंचायत मध्ये येईल त्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक तसेच शिक्षकांनी संबंधीताना सहकार्य करावे असे आवाहान पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.