ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 16 - विवाह सोहळ्यात जेवण करण्याच्या वादातून पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना बोरवण ता़ तळोदा येथे घडली़
भातोली ता़ धडगाव येथील बाश्या दारच्या पावरा व त्यांची पत्नी नकलीबाई हे दोघे बोरवण ता़ तळोदा विवाह सोहळ्य़ासाठी गेले होत़े याठिकाणी आजांडय़ा कालश्या पावरा, परव्या कालश्या पवार, दिलीप कालश्या पवारा सर्व रा़ भातोजी यांनी पावरा दाम्पत्यासोबत वाद घातला़ यावेळी तिघांनी बाश्या पावरा व नकलीबाई यांना काठी, दगडाने डोके आणि पायावर बेदम मारहाण केली़ जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}