शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘काठी’तील घोडेस्वार यंदा ‘हेल्मेट’धारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 11:50 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दसरा निमित्त काठी संस्थानचा होणा:या घोडय़ांच्या शर्यतींचे स्वरूपही आता कालानुरूप बदलू ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दसरा निमित्त काठी संस्थानचा होणा:या घोडय़ांच्या शर्यतींचे स्वरूपही आता कालानुरूप बदलू लागले आहे. यावर्षापासून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष केंद्रीत केले जात असून या शर्यतीतील घोडेस्वार आता हेल्मेट घालून धावणार आहेत.    सातपुडय़ातील काठी संस्थानचा दसरा सर्वदूर परिचीत आहे.  या संस्थानचे राजे उमेद सरकार यांनी या शर्यतीला सुरुवात केली होती. ंतेंव्हापासून संस्थान अंतर्गत असलेल्या सर्व गावातील लोक दसरा निमित्त एकत्र येतात आणि अनोखा दसरा साजरा करतात. आता संस्थाने विलिनिकरण झाले असले तरी दस:याची परंपरा मात्र कायम टिकून आहे. विशेष म्हणजे त्या निमित्ताने होणा:या घोडय़ांच्या शर्यतीला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असल्याने ते एक आकर्षण ठरले आहे. दसरा निमित्ताने सातपुडय़ाच्या अतिदुर्गम भागातील उमदे घोडे या ठिकाणी घोडे मालक स्पर्धेसाठी घेवून येतात. आजवर घोडय़ावर कुठलीही साज न टाकता अतिशय पारंपारिक पद्धतीने घोडेस्वार त्यावर आरुड होतो आणि स्पर्धेत सहभागी होतो. काठी येथेच धडगाव काठी रस्त्यावर सुमारे दोन किलोमिटर अंतरावर जोडीने घोडेस्वार धावतात. अलीकडे या स्पर्धामध्ये सहभागी होणा:या स्पर्धकांची संख्या वाढल्याने या स्पर्धा दोन दिवस चालतात. स्पर्धेपुर्वी परिसरातील सर्व गावातील आदिवासी एकत्र येवून नवाई खुंटाची पूजा करतात. त्यानंतर राजगादीची पूजा होते. या पुजेनंतर रस्त्यावर असलेल्या खुटीच्या ठिकाणी रावणाचे पूजन केले जाते. तेथेच घोडय़ांच्या नालचीही पूजा होते. आणि तेथून घोडय़ाच्या शर्यतीला सुरुवात होतात. ही शर्यत पहाण्यासाठी सातपुडय़ातील विविध गावातील हजारो  नागरिक एकत्र येतात. रस्त्याच्या एका बाजुला डोंगर असून हा डोंगर शर्यतीचा रस्ता असलेल्या दोन किलोमिटर्पयत पुर्ण माणसांनी आच्छादलेला असतो. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी असते.

घोडेस्वारांना हेल्मेट सक्ती या वर्षापासून स्पर्धक प्रत्येक घोडेस्वाराला सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच गेल्या काही वर्षातील अनुभव पहाता रस्त्याच्या दुतर्फा बॅरीकेट्स बांधण्यात येणार आहे. गेल्यावर्षी एक घोडा प्रेक्षकांच्या रांगेत गेल्याने धावपळ उडाली होती. त्याची काळजी घेतली जाणार आहे. यावर्षी सुमारे 100 घोडे स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा असून त्याची नोंदणी सुरू झाल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक सी.के.पाडवी यांनी दिली.