शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गृह अलगीकरण उद्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 13:36 IST

­लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  गृह विलगीकरणात अर्थात होम आयशोलेशनची सुविधा आता बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. ...

­लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  गृह विलगीकरणात अर्थात होम आयशोलेशनची सुविधा आता बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. कोरोना रुग्ण घरी राहून विलगीकरणात न राहता बाहेर फिरतात. त्यामुळे अशा रुग्णांच्या माध्यमातून परिसरात कोरोनाचा प्रसार होतो. संबधीत रुग्ण कुठलाही नियम पाळत नाहीत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी २० फेब्रुवारीपर्यंत गृह अलगीकरणाची सुविधा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात यावे. संबधित अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील कोविड रुग्णालयांचा आढावा घेऊन आवश्यक सुविधा असल्याची खात्री करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.गृह अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झालेल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसात कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर आदेश देण्यात आले आहेत. संपर्कातील सर्व व्यक्तींची नोंद घेण्याचे निर्देश कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची नोंद घेण्याचे निर्देशही डॉ. भारुड यांनी दिले आहेत. कोविड बाधित आढळून आलेल्या गावात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्तिश: भेट द्यावी. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची स्वॅब चाचणी करावी आणि कोविड बाधित आढळून आल्यास तात्काळ कोविड रुग्णालयात दाखल करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.वाढत्या रुग्णांमुळे चिंताजिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतच असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दररोज ३० पेक्षा अधीक रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक कोरोनाचे संक्रमण सद्या शहादा तालुक्यात होत आहे. त्याला कारण कोरोना बाधीत कुठलेही नियम पाळत नाहीत. लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच सार्वजनीक कार्यक्रमांमध्ये या बाबी प्रकर्षाने जानवत आहेत. गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांबाबत तर अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. 

लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईलग्न समारंभ, अंत्यविधी तसेच गर्दी होणाऱ्या इतर विधी व सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवावे असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांकडून मास्क घालणे आणि शारीरिक अंतराबाबत नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.