प्रकाशा परिसरात घर दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST2021-05-04T04:13:25+5:302021-05-04T04:13:25+5:30

यंदा हवामान खात्याने मान्सून लवकरच वर्तविला आहे. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने ...

Home repair work started in Prakasha area | प्रकाशा परिसरात घर दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

प्रकाशा परिसरात घर दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

यंदा हवामान खात्याने मान्सून लवकरच वर्तविला आहे. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने उघडी राहतात. म्हणून कामासाठी लागणाऱ्या वस्तू वेळेत मिळाव्यात, यासाठीदेखील धावपळ करावी लागते. यातून शेतीकामेही कमी झाल्याने अनेकजण घराच्या छतांच्या दुरुस्तीची कामे काढून ती पूर्ण करत असल्याचे दिसून आले आहे. घराच्या छतावरील डागडुजी सुरू केलेली आहे. ज्यांच्या घराच्या छतावरील पत्रे खराब झाले आहेत, त्यांच्याकडून पत्रे बदलण्याचे काम सुरू झाले आहे. जुने पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन पत्रे लावण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी खराब झालेल्या पत्र्यांवर डांबर लावून गळती थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुपारी उन्हाचे चटके लागतात म्हणून हे काम सकाळी सहा वाजेपासून दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा वाजेनंतरच केले जात आहे. यामुळे काम करताना गारव्याचा विचार केला जात आहे. प्रकाशा व परिसरातील गावांमध्ये सध्या ही कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Home repair work started in Prakasha area