शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

हजारो भाविकांच्या साक्षीने पेटली देवाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डाब राजमंडलातील देव-देवतांची होळी साजरी करण्यासाठी याहा मोगी माता यात्रेनंतर डाब ता. अक्कलकुवा येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डाब राजमंडलातील देव-देवतांची होळी साजरी करण्यासाठी याहा मोगी माता यात्रेनंतर डाब ता. अक्कलकुवा येथील मोरी राहीच्या टेकडीवर नंदुरबार जिल्ह्यासह गुजरातमधील आदिवासी बांधव जमले. या बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत रात्रभर नाच-गाण्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर देवतांची होळी विधीवत पेटविण्यात आली.होळीच्या पार्श्वभूमीवर भोंगऱ्या बाजार व काही ठिकाणी प्रत्यक्ष होळीलाच सुरुवात झाली असली तरी डाब राजमंडलातील देव-देवतांची होळी असल्याने मोरी राहीच्या होळीला विशेष मान व महत्व असते. त्यामुळे या होळीसाठी केवळ नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे गुजरातमधूनही आदिवासी बांधव डाब येथे जमले. या सर्व बांधवांच्या उपस्थितीत रात्रभर ढोल वादन स्पर्धा घेण्यात आली. त्याशिवाय नाच-गाणे व विशेष पथकाकडून होळी नृत्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. ढोल स्पर्धेत ६० ढोल सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने बिजरीगव्हाण, साकलीउमर, कुंडल, सरी, वालंबा, सोलाकाट, हुणाखांब, वेहगी, बर्डी, भगदरी, वरखेडी, वेली, जामली येथील ढोल दिसून आले.ढोल स्पर्धेत सहभागी होण्याआधी प्रत्येक ढोलवादक व मालकांकडून आपापल्या ढोलचा दोर व सुरेल आवाजासाठी त्यावर चढवलेले कातड्याची संपूर्ण खातरजमा करण्यात आली. या स्पर्धेत रात्री ३ वाजेच्या सुमारास वालंबा, ता.अक्कलकुवा येथील वाड्या पाडवी व साकलीउमर येथील विरसिंग पाडवी यांचा ढोल सर्वाधिक सुरेल आवाजात वाजत होता. तर चार वाजेपासून या दोन्ही ढोलसह बिजरीगव्हाण, वरखेडी येथील राज्या वळवी, जामली येथील मोज्या तडवी, सरी येथील बिज्या वसावे, बिजरीगव्हाण येथील अशोक तडवी व कुंडल येथील रतिलाल पाडवी याचे ढोलही गरम झाल्याने सुरेल आवाजात वाजू लागले. सहभागी सर्व ढोलमालक व वादकांना डाब येथील गावपंचायतीमार्फत वाहतुक खर्चासह अपेक्षित मदत करण्यात आली.४डाब राजमंडलातील देवतांची होळी ही परंपरेनुसार मोरी राही या डोंगरावर पेटवली जाते. तेथे जागेचा अभाव असल्यामुळे मुख्य कार्यक्रम डाबच्या मध्यवर्ती भागात घेतला जातो. सोयीच्या ठिकाणी रात्रभर कार्यक्रम घेतला जात असला होळी पहाटे पेटविण्यात येणार असल्याने पेटवण्यापूर्वी होळी पूजेसाठी मोरी राही या टेकडीवरच भाविकांना जावे लागते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात केवळ चंद्राच्या उजेडाचा आधार घेत हजारो भाविक या डोंगराकडे जात होते. हा डोंगर तीव्र उतार शिवाय उंचसखोल दरीतील पायवाटेने होळीपर्यंत जावे लागते. रात्रीचा अंधार शिवाय दरी असतानाही तेथे जाणाºया भाविकांना कुठलीही अडचण आली नाही. डोंगरावर जाणाºया भाविकांमध्ये केवळ तरुणच नव्हे तर वृद्धांचाही सहभाग अधिक होता. त्यामुळे होलीदेवतेची कृपा असल्याचे डोंगरावर पूजेसाठी जाणाºया भाविकांकडून सांगण्यात आले.४अक्कलकुवा पंचायत समितीचे माजी सभापती बिज्या वसावे यांनीही मोरी राही येथील होळीसाठी ढोल आणला. एवढेच नव्हे तर त्यांचा ढोल स्पर्धेत आघाडीवर राहिलेल्या ढोलपैकी एक होता. तर धडगाव त्यालुक्यतील वरखेडी सरपंच राज्या वळवी व कुंडल येथील माजी उपसरपंच दिवाल्या पाडवी यांनीही ढोल आणले, हे ढोलही आघाडीवरच राहिले.