शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

चुलीवरील खिचडीची अनोखी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुरू असलेल्या व काही वर्गांच्या लवकरच सुरू होणाऱ्या परीक्षांच्या व अभ्यासाच्या ताणतणावातून विद्यार्थीनींना दूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुरू असलेल्या व काही वर्गांच्या लवकरच सुरू होणाऱ्या परीक्षांच्या व अभ्यासाच्या ताणतणावातून विद्यार्थीनींना दूर करण्यासाठी ‘चुलीवरील खिचडी’ ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. नंदुरबारातील मुलींचे अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी वसतिगृहात ही स्पर्धा रंगली.समाजकल्याण विभागाद्वारे संचलित अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, नंदुरबार येथे आगळावेगळा गाव वसला होता. अधिक्षिका सुषमा मोरे यांच्या संकल्पनेतून वनभोजनाप्रमाणे ग्रामीण पद्धतीच्या भोजनाचा आस्वाद देणारी ' चुलीवरील खिचडी' ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली.शाळेतील १३ रूम या विद्यार्थिनींच्या निवासोपयोगी आहेत. त्या प्रत्येक रूमच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रांगणात आपापल्या रूमच्या मुलींसाठी चुलीवर खिचडी व इतरही अनेक खाद्यपदार्थ बनविले. प्रत्येक रूमला शाळेच्या प्रांगणात जागा व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते.गृहसजावट, वस्तूमांडणी, स्वच्छता, रांगोळी, खिचडीची चव, प्लेट डेकोरेशन, तोंडी लावण्याचा पदार्थ यावरून गुणांकन करण्यात आले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना चावला गृह निकिता बागुल व ग्रुप, द्वितीय क्रमांक डॉ. आंनदीबाई जोशी गृह नयना अहिरे व ग्रुप, तृतीय क्रमांक- बहिणाबाई चौधरी गृह महेश्वरी बागुल व ग्रुप यांनी पटकावला.परिक्षक म्हणून नामदेव शिंदे, ज्योती शिंदे व शीतल ठाकूर हे होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वत: ग्रामीण पद्धतीने स्वयंपाक बनविण्याचा आनंद तर घेतलाच तसेच विविध पद्धतीने गृहसजावट व प्लेट डेकोरेशनही केले होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण होते.