बिबट्याच्या हल्ल्यात मयत बालिकेच्या वारसांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:52 PM2020-09-05T12:52:29+5:302020-09-05T12:52:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेच्या वारसांना आमदार राजेश पाडवी यांच्या ...

Helping the heirs of a deceased girl in a leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात मयत बालिकेच्या वारसांना मदत

बिबट्याच्या हल्ल्यात मयत बालिकेच्या वारसांना मदत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील सोजरबार येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेच्या वारसांना आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. वनविभागाकडून शासकीय तरतुदीनुसार ही रोख स्वरूपात मदत देण्यात आली आहे.
१६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारस तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या सोजरबार येथील सहा वर्षीय चिमुकली शिला भिमसिंग नाईक हिला झोपडीत बिबट्याने हल्ला करत ती झोपेत असताना उचलून नेले होते. बिबट्याच्या या हल्ल्यात ती मृत्यूमुखी पडली होती. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत केली जाते. बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या शीला नाईक हिच्या वारसांना वनविभागाकडून १५ लाखांची मदत करण्यात आली असून गुरुवारी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मयत बालिकेचे वडील भीमसिंग चांद्या नाईक व आई पेटकीबाई नाईक यांना पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. उर्वरित १० लाख रुपये हे राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स डिपॉझीट म्हणून वारसांच्या नावावर ठेवले जाणार आहेत. यावेळी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, वनक्षेत्रपाल संरक्षक नीलेश रोडे, राजविहीर परिमंडळ अधिकारी वासुदेव माळी आदी उपस्थित होते.
 

Web Title: Helping the heirs of a deceased girl in a leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.