महावीर पतसंस्थेतर्फे ‘कोरोना’साठी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:48 PM2020-03-28T12:48:03+5:302020-03-28T12:48:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी येथील श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेने एक लाख ११ हजार रुपयांची ...

The help of people's struggle in Arunachal Pradesh, Nashik | महावीर पतसंस्थेतर्फे ‘कोरोना’साठी मदत

महावीर पतसंस्थेतर्फे ‘कोरोना’साठी मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी येथील श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेने एक लाख ११ हजार रुपयांची मदत पंतप्रधान सहायता निधीला दिली आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्याकडे मदतनिधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
कोरोना व्हायरसपासून जनतेला वाचवण्यासाठी शासनाकडून पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधानांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. या काळात गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाला आर्थिक हातभार लागावा म्हणून दानशूर व्यक्ती व संस्थांकडून मदत करण्यात येत आहे. त्यानुसार येथील श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पंतप्रधान सहायता निधीसाठी एक लाख ११ हजार रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, महावीर पतसंस्थेचे चेअरमन रमेशचंद चोरडिया, व्हा.चेअरमन विनयचंद्र गांधी, कार्याध्यक्ष पारसकुमार देसर्डा, पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.कांतीलाल टाटीया, व्हा.चेअरमन विनोद शंकर सोनार, महावीर पतसंस्थेचे संचालक उत्तम कोटडिया, समीर जैन, जयचंद नाहटा, बनेचंद बोथरा, ललीत छाजेड, मांगीलाल बोथरा, राजाराम पाटील, विनोद साळी, वृषभ गेलडा, बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र जैन, मोतीलाल जैन आदी उपस्थित होते.

Web Title: The help of people's struggle in Arunachal Pradesh, Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.