शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदासाठी पाडवींची जोरदार ‘फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याने त्यासाठी मंत्रीपद मिळावे यासाठी अनेक आमदारांनी दिल्लीत ठाण मांडला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याने त्यासाठी मंत्रीपद मिळावे यासाठी अनेक आमदारांनी दिल्लीत ठाण मांडला आहे़ विशेषत: काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांचे नाव आघाडीवर असून त्यासाठी कार्यकर्त्यांची जोरदार फिल्डिंग सुरु आहे़राज्यात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे़ सुरुवातीला मुख्यमंत्र्यांसह केवळ सहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे़ उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे़ सत्ताधारी पक्षापैकी जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार आहेत़ त्यात आमदार के़सी़पाडवी व आमदार शिरीष नाईक यांचा समावेश आहे़ हे दोन्ही आमदार राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने दोघांनी मंत्रीपदाचा दावा केला आहे़ अ‍ॅडक़े़सी़पाडवी हे सलग सात वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत़ यापूर्वी त्यांना काँग्रेस पक्षातर्फे आघाडीचे सरकार असताना राज्यमंत्रीपदासाठी निमंत्रण होते़ मात्र त्यांनी राज्यमंत्री पद स्विकारण्यास नकार दिला होता़ नुकतीच त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली़ त्यात पराभूत झाले असले तरी त्यांना मोठे मताधिक्क्य मिळाले होते़ पक्षांतराच्या वातावरणात अनेकांनी पक्ष सोडला असला तरी ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले़ त्यामुळेच विधानसभा निवडणूकीत त्यांना राज्यात महत्त्वाचे स्थान पक्षाने दिले होते़ सत्ता स्थापनेतही पक्षाच्या समितीत ते होते़ त्यामुळे सहाजिकच मंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे़ सध्या ते दोन दिवसांपासून दिल्लीतच पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेत आहेत़ अर्थात त्यांचे नाव आघाडीवर असले तरी आमदार शिरीष नाईक हे देखील प्रबळ दावेदार आहेत़ माजीमंत्री व ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे ते पुत्र असून त्यांचा गांधी घराण्याशी जवळचा संबध आहे़ दिल्लीत त्यांचे वजन असल्याने शिरीष नाईक यांचीदेखील मंत्रीपदासाठी वर्णी लागू शकते अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे़ जिल्ह्यातील व राज्यातील काही नेते देखील त्यांच्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे़काँग्रेस पक्षात ऐनवेळी काहीही घडू शकते अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असून त्यामुळे मंत्रीपदासाठी आमदार अ‍ॅड़ के़सी़पाडवी कि शिरीष नाईक या दोघांपैकी कोणाची वर्णी लागते़ याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़