वाकीपाडा येथे रॅपिड टेस्टींग शिबिरात आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST2021-04-10T04:29:48+5:302021-04-10T04:29:48+5:30

वाकीपाडा गावातील एका युवकाची कोरोना रॅपिड टेस्टींग करण्यात आली. त्यात पॉझिटिव्ह आलेल्या एकाने त्यानंतर गुजरात राज्यातील उच्छल येथे ...

Health worker beaten at Rapid Testing Camp at Wakipada | वाकीपाडा येथे रॅपिड टेस्टींग शिबिरात आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण

वाकीपाडा येथे रॅपिड टेस्टींग शिबिरात आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण

वाकीपाडा गावातील एका युवकाची कोरोना रॅपिड टेस्टींग करण्यात आली. त्यात पॉझिटिव्ह आलेल्या एकाने त्यानंतर गुजरात राज्यातील उच्छल येथे जाऊन तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याचा राग आल्याने त्याने पुन्हा वाकीपाडा येथे येऊन आरोग्य सेवक दशरथ हिरालाल मुसळदे या कर्मचाऱ्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शिबिरातील कागदपत्रे फेकून दिल्याची तक्रार नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. त्यानंतर तहसीलदारांनी त्या युवकावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना दिले. आरोग्य सेवक दशरथ हिरालाल मुसळदे यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी घटनेचा निषेध केला. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा निर्णय आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला. दुपारपर्यंत रॅपिड टेस्टींगचे काम बंद करण्यात आले होते. नवापूर पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेऊन वरिष्ठ महाविद्यालयातील कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले.

Web Title: Health worker beaten at Rapid Testing Camp at Wakipada