शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील जुना प्रकाशा रोडला लागून असलेल्या साळी गल्ली भागात तुटक्या व काही ठिकाणी गटारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील जुना प्रकाशा रोडला लागून असलेल्या साळी गल्ली भागात तुटक्या व काही ठिकाणी गटारी बुजल्या गेल्याने सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी जागा नसल्यामुळे या परिसरात असलेल्या खाजगी मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याची डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने याकडे लक्ष देऊन साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी सोय करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.जुना प्रकाशा रोड भागाला लागून गांधी चौक, गुजर गल्ली, साळी गल्ली या शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या वसाहती आहेत. या वसाहतीतील घरांमधील सांडपाण्याचा निचरा याच गटारीमधून केला जातो. तेच पाणी पुढे जाऊन नदीपात्रात सोडले जाते. मात्र साळी गल्लीत काही ठिकाणी गटारी जीर्ण व तुटक्या झाल्याने बुजल्या गेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी गटारीतून न वाहता या भागातील वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर असलेल्या खाजगी मोकळ्या जागांमध्ये सांडपाण्याचे डबके साचत आहेत. या परिसरात साचून असलेल्या सांडपाण्याच्या निचरा होत नसल्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात वराहांचाही वावर वाढल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.एकीकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून विविध आजार डोके वर काढत असल्याने नागरिकांना आजारांना बळी पडावे लागत आहे. या साठलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये वराहांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागा नसल्याने ही मुले या डबक्याजवळच खेळत असल्याचे चित्र आहे.सांडपाणी ज्याठिकाणी साचत आहे. त्याठिकाणी या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरे बांधण्यासाठी व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी खळे तयार केले आहेत. मात्र गटारच बुजली गेल्याने हे सर्व सांडपाणी हळूहळू आता खळ्यांमध्ये यायला सुरुवात झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित दुरुस्ती करून उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.