शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी तर्फे सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोटरी क्लब नंदनगरीने नगरपरिषदेचे कर्मचारी व सेवा फाऊंडेशनचे सफाई कर्मचारी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोटरी क्लब नंदनगरीने नगरपरिषदेचे कर्मचारी व सेवा फाऊंडेशनचे सफाई कर्मचारी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाबुराव बिक्कड, नंदनगरी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रितीश बांगड, प्रीतम ढंढोरे, भारत भूषण, अभियंता विशाल कांबळे आदी उपस्थित होते. आरोग्य तपासणीसाठी डॉ.गौरव तांबोळी (जसलोक हॉस्पिटल, मुंबई) व डॉ.स्वप्नील महाजन (एम.जी.एम. रुग्णालय, औरंगाबाद) उपस्थित होते. नगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांनी नंदुरबार शहरात कोरानाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वॉरियर्स म्हणून काम करीत आहेत. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले. प्रास्ताविक रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष प्रितीश बांगड यांनी केले. सूत्रसंचालन किरण दाभाडे तर आभार सचिव नागसेन पेंढारकर यांनी मानले. शिबिरासाठी रोटरी क्लब नंदनगरीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

रोटरीतर्फे घेण्यात आलेल्या या शिबिरांतर्गत दिवसभरात ४५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ हे सर्व सफाई कामगार आहेत़ त्यांच्या तपासणीनंतर डॉक्टरांकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढीच्या गोळ्या औषधींसह आरोग्यविषयक सल्लेही देण्यात आले़ येत्या रविवारी रोटरीकडून पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी होणार असून त्यांना औषधी दिली जातील़