शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘हरिहर भेट’ यंदा केली अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेल्या हरिहर भेटीला यंदा दादा व बाबा गणेश मंडळांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेल्या हरिहर भेटीला यंदा दादा व बाबा गणेश मंडळांनी अर्धविराम देण्याचे ठरविले आहे. कोरोनामुळे मिरवणुका निघणार नाहीत. त्यामुळे ही भेटही होणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्याची अधिकृत घोषणा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दोन्ही मंडळांनी केली. शिवाय पारंपारिक रथावरून मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन दुपारपर्यंत आटोपले जाणार असल्याचे स्पष्ट आहे.
गणेशोत्सवात प्रत्येक भाविकाला आकर्षण असते ते दादा व बाबा गणपतीच्या हरिहर भेटीचे. दरवर्षी सायंकाळी साधारणत: आठ ते दहा वाजेच्या दरम्यान जळका बाजारात ही भेट होते. ही भेट पहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा ही भेट होणार की नाही याबाबत भाविकांमध्ये संभ्रम होता. निर्णय काय होतो याकडे लक्ष लागून होते. अखेर ही भेट रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नंदुरबारातील मानाच्या दादा गणपतीची मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात येते. दिवसभर मुख्य मिरवणूक मार्गावरून ही मिरवणूक सायंकाळी साडेसात ते आठ वाजता जळका बाजार परिसरात येते. त्याच्या समोरूनच बाबा गणपतीची मिरवणूक देखील येते. दोन्ही गणपतींचे रथ समोरासमोर आल्यावर आरती करण्यात येते. त्यानंतर गुलाल आणि फुलांची उधळण करून भेट साजरा केली जाते. त्यानंतर दादा, बाबा व इतर मानाच्या गणपतींच्या मागे पारंपारिक पद्धतीने तालीम संघाची मंडळे असतात. त्यामुळे या भेटील मोठे महत्व असते.
यंदा कोरोनाच्या अनुषंगाने या दोन्ही मानाच्या मंडळांसह काका गणपती मंडळ पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुका न काढण्याचे ठरविले आहे. दादा गणपतीचे पदाधिकारी निलेश सोनार, सत्यवान सोनार, सुनील सोनार, नरेंद्र सोनार, उदय सोनार आणि श्री बाबा गणपती उत्सव समितीचे मोरेश्वर सोनार, राकेश सोनार, प्रसाद सोनार, गौरव सोनार, विकास सोनार. काका गणपती मंडळाचे अश्विन सोनार, अरुण सोनार, सागर सोनार यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन त्याबाबतचे लेखी विनंतीपत्र दिले.
दोन्ही प्रमुख मंडळे रथावर अथवा इतर कोणत्याही प्रकारे मिरवणूक काढणार नाहीत. गणेशमूर्ती चारचाकी वाहनात ठेऊन फक्त दोन किंवा मोजक्या भक्तांकरवी सोनी विहिरीत विसर्जन केले जाणार आहे. मंडळांच्या या निर्णयाबद्दल पोलीस अधीक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.