१० लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:52 IST2020-02-07T12:52:27+5:302020-02-07T12:52:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील माहेर तर पुनगाव ता़ चोपडा येथील सासर असलेल्या विवाहितेचा १० लाख रुपयांसाठी ...

Harassment of the bride for Rs 1 lakh | १० लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

१० लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथील माहेर तर पुनगाव ता़ चोपडा येथील सासर असलेल्या विवाहितेचा १० लाख रुपयांसाठी छळ करण्यात आला़ विवाहितेने पोलीसात फिर्याद दिल्यानंतर हा प्रकार समोर आला़
सप्रिया बाविस्कर यांचा विवाह नोव्हेंबर २०१७ मध्ये पुनगाव येथील संदीप बाविस्कर याच्यासोबत झाला होता़ विवाहाच्या महिनाभरानंतर संदीप व त्याच्या कुटूंबियांनी सुप्रिया यांनी शहादा येथील माहेरुन फ्लॅट बुकींगसाठी १० लाख रुपये आणावेत असा तगादा लावला होता़ यातून वेळोवेळी मारहाण करुन छळ करण्यात येत होता़ या छळाला कंटाळून त्यांनी शहादा पोलीसात फिर्याद दिली़ यानुसार पती संदीप, सासरे गोपाळ दामु बाविस्कर, सासू सिंधूबाई, ज्योती प्रदीप बाविस्कर रा, पुनगाव, रमाकांत विठ्ठल सोनवणे, सनिता रमाकांत सोनवणे, अनिता प्रल्हाद बाविस्कर, सखलाल चिंतामण बाविस्कर सर्व रा़ जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणावर तातडीने कारवाई करण्याची अपेक्षा पीडित महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केली आहे.

Web Title: Harassment of the bride for Rs 1 lakh