शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सहा जण कोरोनामुक्त झाल्याने एकाच वेळी खुशी आणि गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/बामखेडा : शहादा येथील पाच तर ब्रिटीश अंकुशविहिर, ता.अक्कलकुवा येथील एक असे सहा जण कोरोनामुक्त झाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/बामखेडा : शहादा येथील पाच तर ब्रिटीश अंकुशविहिर, ता.अक्कलकुवा येथील एक असे सहा जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याबाबत समाधान व्यक्त होत असतांना त्याच वेळी बामखेडा, ता.शहादा येथील एक जण नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेतांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली. सात दिवसांपूर्वी हा रुग्ण नाशिक येथे उपचारासाठी दाखल झाला होता.जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा तालुक्यातील १० कोरोना रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी सहा जणांवरील उपचार पुर्ण झाले. त्यांचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी सांयकाळी उशीरा जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यात पाच जण शहादा येथील तर एकजण ब्रिटीश अंकुश विहिर येथील आहे. या सहा जणांसह आतापर्यंत १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांचे अखेरचे दोन कोविड-१९ चाचणी अहवाल निगेटीव्ह आले असून संसर्गमुक्त झाल्याने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. इतर ३१ व्यक्तींचे अहवालदेखील निगेटीव्ह आले आहेत.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी. सातपुते, डॉ.राजेश वसावे, डॉ.राजेंद्र चौधरी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.यापूर्वी नऊ रुग्ण संसर्गमुक्त झाले असून १० रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी चार रुग्णांचे १४ दिवसानंतरच्या चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. संसर्गमुक्त झालेल्या रुग्णात शहादा येथील तीन पुरुष आणि दोन मुलींचा समावेश आहे, तर अक्कलकुवा येथील एका पुरुषाचा समावेश आहे.जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. वेळेवर संसगार्चे निदान झाल्याने उपचाराअंती रुग्ण संसर्गमुक्त होत आहेत. पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले असून इतरही रुग्ण लवरच संसर्गमुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.जिल्हा प्रशासनाने संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर दिला असून नागरिकांना संसर्ग टाळण्याबाबत आवाहनही सातत्याने करण्यात येत आहे.या आजारावर कोणतेही औषध सध्या उपलब्ध नसून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये सहा फूटाचे अंतर ठेवून विषाणूची श्रृंखला तोडणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास जिल्हा ग्रीन झोनमध्ये येऊन येथील इतर व्यवहार सुरळीत होऊ शकतील. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बामखेडा, ता.शहादा येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोवीड-१९ पॉझिटिव्ह आला आहे. किडनी रोगाने त्रस्त रुग्ण नाशिक येथील खाजगी रुग्णालयात बामखेड़ा येथून ९ मे रोजी दाखल झाला होता. तेथे त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे व कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची प्रशासनाद्वारे उशिरापर्यंत तपासणी करण्याचे काम सुरु होते. त्यांच्या कुटूंबातील ८ जणांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण गावात खबरदारी म्हणून उपाय योजना करण्यात येत आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, सारंगखेड़ा पोलिस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत सरोदे, वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहने व त्यांचे पथक तसेच पोलिस पाटील डॉ योगेश चौधरी, सरपंच लीना चौधरी यांनी भेट देवून उपाययोजनेच्या सुचना केल्या.