शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यात पिकांना गारांचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या ...

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात १० ते १५ मिनिटे टप्प्याटप्प्याने गारपीट झाली. दरम्यान जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातही गारपिटीची माहिती आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात २० ते २२ मार्च दरम्यान वेगवान वारे व वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर शेतक-यांना प्रशासनाकडून माहिती देण्यात आली होती. शनिवारी दुपारी चारपर्यंत आकाश निरभ्र होते. दुपारी चार वाजेनंतर मात्र नंदुरबार शहर व लगतच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होवून प्रारंभी तुरळक पाऊस व त्यानंतर गारपीट सुरु झाली. यातून ग्रामीण हद्दीतील रस्ते व शेतशिवार जलमय झाले होते. तालुक्यातील दुधाळे, वाघाळे, दहिंदुले, चाैपाळे, कोळदे, लहान शहादे, धामडोद यासह पूर्व भागातील शनिमांडळ, वैंदाणे आदी गाव परिसरात गारांचा पाऊस पडल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या गहू आणि कापणी केलेला हरभरा या पिकांना गारपीट व अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला असल्याची माहिती देण्यात आली आहे. गारपीटीमुळे शेतकऱ्यांनी साठवलेल्या चाऱ्याचेही नुकसान झाले आहे. गारपिटीनंतर तहसील प्रशासनाकडून मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवारी नुकसानीचे पंचनामे होण्याची शक्यता आहे. नंदुरबार शहरात सुमारे १० मिनीटे पाऊस सुरु होता. यावेळी मिरची पथारींवर असलेल्या मिरचीला झाकण्यासाठी मजूरांची धावपळ सुरु होती. बाजार समितीत सध्या गहूची मोठी आवक झाली असून गहू शेडमध्ये नेण्यासाठी मजूर कार्यरत असल्याचे दिसून आले. दरम्यान गारपीटीमुळे टरबूजाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तीव्र वेगाने पडणारी गार थेट फळात गेल्याने नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

नवापूर तालुक्यात गारपीट

नवापूर तालुक्यातील विसरवाडीसह कोंडाईबारी घाटात २० ते २५ मिनीटे मुसळधार पाऊस व गारपीट झाल्याची माहिती देण्यात येत आहे. या भागातील शेतक-यांना याचा फटका बसला आहे. तालुक्यातील इतर भागातही गारपीट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शहादा तालुक्यात धावपळ

शहादा तालुक्यात सायंकाळी मेघगर्जना सुरु झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. बहुतांश शेतक-यांनी हरभरा कापून मळणीसाठी शेतात ठेवला आहे. हा हरभरा झाकण्यासाठी त्यांची धावपळ सुरु होती.