शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

उमर्दे येथे महिलांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

नंदुरबार : तालुक्यातील उमर्दे येथे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष ,जन साहस संस्था आणि ...

नंदुरबार : तालुक्यातील उमर्दे येथे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष ,जन साहस संस्था आणि चाईल्ड लाईन यांचा संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नाना ठाक होते. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बालकल्याण समिती अध्यक्ष विठ्ठल कदम, बालकल्याण समिती सदस्य सीमा सूर्यवंशी, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनीता सोनवणे, जन साहस संस्थेचे कायदेशीर सल्लागार शीतल जावरे, पूजा ढेपे उपस्थित होते. प्रास्ताविक जन साहस संस्थेचे जिल्हा समन्वयक विकास मोरे यांनी केले. यावेळी महिलांच्या मदतीसाठीचा २४ तास सुरू राहणारा टोल फ्री क्रमांकाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात बालसंरक्षणाची माहिती देण्यात आली. विठ्ठल कदम यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या विषमता समाजातून हद्दपार करण्यासाठी पुरुषांनी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे, असे मत मांडले. बालसंरक्षण अधिकारी गौतम वाघ जन्मापासून मुलगा आणि मुलगी यांचामध्ये केला जाणारा लिंग भेद नष्ट करत पुरुषांना स्त्रियांचा आदर करायला शिकवणे काळाची गरज असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अनिता गावीत यांनी तर आभार मेघा पाटील यांनी मानले.

कार्यक्रमास ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व महिला सहभागी झाल्या होत्या. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमात महिलांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.