शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प बाधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रहातून शहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी ...

तळोदा : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी व डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंती दिनी नर्मदा बचाओ आंदोलनाने मंगळवारी तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या वसाहतीत मिट्टी सत्याग्रह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात जीवन नगर, नर्मदा आशिष नगर, गंगा नगर, मोड, न्यूबन, गोपाळपूर, रोझवा, रेवा नगर व नर्मदा नगर अशी मोटारसायकल यात्रा काढण्यात आली होती.

या वेळी विस्थापितांनी आपल्या पुनर्वसन वसाहतीमधून एकमूठ माती घेवून केंद्र शासनाच्या अन्याय कारक शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करत यातून जमीन वाचविण्याचा संकल्प केला. केंद्र सरकारने जे तीन शेतकरी विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळे देशातील शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार या सर्वांची रोजीरोटी प्रभावित होणार आहे. या कायद्यामुळे आमची खेती, आमची माती मोठ मोठ्या उद्योगपतीच्या ताब्यात जाणार आहे. म्हणून तिला वाचवण्यासाठी ३० मार्चला दांडी येथून निघणाऱ्या मिट्टी सत्याग्रह यात्रेत सहभागी होणार व ही यात्रा ६ एप्रिलला दिल्ली येथे पोहोचणार आहे.

या यात्रेसोबत आमची नर्मदा घाटीची मातीही पोहोचणार आहे. देशभरातून वेगवेगळ्या संघटना आपापल्या क्षेत्राची माती घेवून पोहोचणार असून, या मातीने किसान आंदोलनात आतापर्यंत शहिद झालेल्या शेतकऱ्यांचे शहीद स्मारक बनविले जाणार आहे. व जो पर्यंत केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करीत नाही तो पर्यंत आम्ही शेतकरी आंदोलनासोबत असणार आहे. या मिट्टी सत्याग्रहात नर्मदा नगरचे सरपंच पुण्या वसावे, रेवा नगरचे सरपंच हिरालाल पावरा, पोलीस पाटील जोरदार पावरा, कृष्णा पावरा, कांतीलाल पावरा, लालसिंग वसावे, छगन पावरा, ओरसिंग पटले, खेमसिंग पावरा, रंजना पावरा, आशा वसावे, चेतन साळवे यासह अनेक मिट्टी सत्याग्रहींनी मोटारसायकल रॅलीत सहभाग घेतला.

नर्मदा घटीची माती दिल्लीला पोहचणार

तळोदा व शहादा येथील विस्थापितांची मिट्टी सत्याग्रह यात्रा ६ एपरील रोजी दांडी येथे पोहचणार आहे. तेथील मिट्टी सत्याग्रह बरोबर ही यात्रा निघून दिल्ली येथे पोहचणार आहे. तळोदा तालुक्यातून विस्थापितांच्या वसाहतीत निघालेल्या या मोटार सायकल रॅलीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या अन्यायी तीन कायद्यान विरोधात जोरदार घोषणा दिल्या होत्या.