जाऊळाचा कार्यक्रम आटोपून येत असतांना झालेल्या अपघातात आजोबा-नातू ठार

By Admin | Updated: April 19, 2017 13:06 IST2017-04-19T13:06:52+5:302017-04-19T13:06:52+5:30

गांगुर्डे कुटूंबाचा एकुलता एक मुलगा गेल्याने कुंटूंबावर शोककळा पसरली आहे.

Grandfather killed in an accident when coming off the show | जाऊळाचा कार्यक्रम आटोपून येत असतांना झालेल्या अपघातात आजोबा-नातू ठार

जाऊळाचा कार्यक्रम आटोपून येत असतांना झालेल्या अपघातात आजोबा-नातू ठार

 नंदुरबार,दि.19 - तलावीपाडा, ता.नंदुरबार येथील आजोबा-नातूचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याने गावात शोकाकूल वातावरण आहे. गांगुर्डे कुटूंबाचा एकुलता एक मुलगा गेल्याने कुंटूंबावर शोककळा पसरली आहे.

तलावीपाडा येथील बान्या चमा:या गांगुर्डे (50) हे आपल्या नातवासह राहुल कृष्णा गांगुर्डे (13) याच्यासोबत धवळीविहिर येथे नातेवाईकांच्या जाऊळच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी गेले होते. जाऊळ आटोपून विसरवाडी येथे कामानिमित्त थांबले. तेथून तलावीपाडा गावी परत येत असतांना हा अपघात घडला. आजोबा-नातूला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

Web Title: Grandfather killed in an accident when coming off the show