शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत उमेदवारांना आता ॲानलाईन खर्च सादर करण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना आधी निवडणूक अर्ज व इतर कागदपत्र ॲानलाईन सादर करताना अनेक अडचणी आल्या. आता निवडून ...

नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना आधी निवडणूक अर्ज व इतर कागदपत्र ॲानलाईन सादर करताना अनेक अडचणी आल्या. आता निवडून आल्यानंतर उमेदवारांना ॲानलाईन खर्च सादर करण्याची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. निवडून आलेल्या उमेदवारांनी गावात, समाजात, नातेवाईक तसेच मित्र परिवारात जल्लोष केला. आता उमेदवारांना ॲानलाईन खर्च सादर करण्याची डोकेदुखी वाढली आहे. ही किचकट बाब निवडून आलेल्या उमेदवारांना जिकरीची ठरत आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन खर्च सादर करणे म्हणजे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आहे. निवडणुकीला उभे असलेल्या काही उमेदवारांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत, तसेच आयोगाचे हे ॲप नवीन व्हर्जनच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत आहे. उमेदवार सातवी पास असले तरी काही उमेदवारांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. खर्च कसा सादर करायचा, या विवंचनेत आहेत.

असा सादर करावा लागतो ॲानलाईन खर्च

ट्रू वोटर ॲप हे एका मोबाईलवर इन्स्टॉल केल्यानंतर दुसऱ्या मोबाईलवर उमेदवाराचा नंबर वापरून करता येणार नाही. कारण फक्त एकाच मोबाईलचा नोंदणी क्रमांक एका व्यक्तीकरिता करण्याची व्यवस्था आहे. शिवाय मोबाईलमध्ये भरपूर स्पेस असणे आवश्यक आहे. हे ॲप इन्स्टॉल करण्याअगोदर संबंधित उमेदवाराने ऑनलाईन नामनिर्देशन अर्ज भरलेला असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या अँड्रॉईड मोबाईलवर हे ॲप इन्स्टॉल करून त्यात खर्च भरावा लागणार आहे.

...या आहेत अडचणी

दुर्गम भागात गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर वाढला असला तरी टूजी आणि थ्रीजी नेटर्वकही योग्य त्या प्रकारे चालत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. यातून उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेकांना अडचणी आल्या होत्या. यामुळे आता निवडणूक खर्च कसा भरावा, याबाबत विजयी आणि पराभूत उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे.

एक हजार २२९ उमेदवारांनी केली होती उमेदवारी, निवडून आले ५३०

या निवडणुकीत एकूण १ हजार २२९ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. यातील ५३० सदस्य निवडून आले आहेत. सुमारे १ हजारपेक्षा अधिक असलेल्या या उमेदवारांनी ॲप डाऊनलोड केले असले तरीही ते भरावे कसे, याची माहिती नसल्याने अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी नेटर्वक नसल्याने उमेदवारांना माहिती भरणेही अवघड ठरत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने ॲाफलाईन खर्च सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

दुर्गम भागात आधीच नेटवर्कची अडचण आहे. त्यात आवश्यक असलेला स्मार्ट फोन नाही. त्यामुळे खर्च कसा सादर करावा, हा प्रश्न आहे. त्यासाठी आता निवडणूक आयोगाने ऑफलाईन खर्च सादर करण्याची परवानगी द्यावी. तसे झाल्यास सर्वच उमेदवार लागलीच खर्च सादर करण्यासाठी पुढे येतील व निवडणूक आयोगाचे कामकाजही सुटसुटीत होईल.

- जे. पी. पाटील, निवडून आलेले उमेदवार.