अतिदुर्गम भागात बाजर्द्वारे धान्य वितरण

By Admin | Updated: April 21, 2017 12:31 IST2017-04-21T12:31:06+5:302017-04-21T12:31:06+5:30

द्वारपोच योजना : सरदार सरोवराच्या जलाशयातून धान्याचा प्रवास

Grain distribution by the market in the backward areas | अतिदुर्गम भागात बाजर्द्वारे धान्य वितरण

अतिदुर्गम भागात बाजर्द्वारे धान्य वितरण

 अक्कलकुवा, जि.नंदुरबार, दि.21-तालुक्यातील अति दुर्गम भागात नर्मदा काठावरील गावांना चार महिन्यांचे स्वस्त धान्य द्वारपोच योजनेंतर्गत वितरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आह़े तालुका पुरवठा विभाग ‘बाजर्’द्वारे धान्याचे वितरण करत आह़े 

 या योजनेंतर्गत मंगळवारी तालुका पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी चिमलखेडी येथे लाभार्थीना चार महिन्यांच्या धान्याचे वितरण केल़े चिमलखेडी येथील माँ नर्मदा महिला बचत गट स्वस्त धान्य दुकानदाराला हे स्वस्त धान्य पोहोचवण्यात आल़े यात अंत्योदय योजनेंतर्गत गहू, तांदूळ, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तांदूळ, गहू, साखरेचे वाटप करण्यात आल़े साधारण 200 किलोमीटरच्या प्रवासानंतर हे धान्य बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये पोहोचवण्यात आले आह़े  
अक्कलकुवा तालुक्यातील 48 हजार 14 शिधापत्रिकांधारकांपैकी साधारण पाच हजार शिधापत्रिकाधारकांना द्वारपोच योजनेचा लाभ मिळत आह़े अक्कलकुवा येथील गोदामातून चारचाकी वाहनाद्वारे गुजरात राज्यातील केवडिया कॉलनी, तेथून बाजर्द्वारे सरदार सरोवर प्रकल्पातून बाजर्द्वारे चिमलखेडी येथे हे धान्य पुरवठा करण्यात येत आह़े नर्मदा काठावर द्वारपोच योजनेंतर्गत महाकाय अशा सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयातून शेकडो क्विंटल धान्य पोहोचवले जात आह़े जलक्षेत्रातून जाताना होणारा प्रवास हा जिवावर उठणारा आह़े दरवर्षी पुरवठा विभागाचे कर्मचारी जीवधोक्यात घालून हे काम तडीस नेत आहेत़ 

Web Title: Grain distribution by the market in the backward areas