राज्यपाल दौऱ्यासाठी मोलगी झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:38 PM2020-02-19T12:38:35+5:302020-02-19T12:38:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात २० रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भेट ...

The governor is pleased to pay a visit | राज्यपाल दौऱ्यासाठी मोलगी झाले चकाचक

राज्यपाल दौऱ्यासाठी मोलगी झाले चकाचक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात २० रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भेट देणार आहेत़ दुर्गम भागातील मोलगी आणि भगदरी ता़ अक्कलकुवा येथे राज्यपाल विविध उपक्रमांना भेट देणार असल्याने दोन्ही गावे चकाचक करण्याचे काम सुरु आहे़
राज्यपाल कोश्यारी हे गुरुवारी सकाळी हेलिकॉप्टरने मोलगी येथे येणार आहेत़ युनिसेफच्या सहाय्याने मोलगी येथे तयार करण्यात आलेल्या पोषण पुनवर्सन केंद्राचे २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन झाले होते़ याठिकाणी किमान १५ बालकांवर दर दिवशी उपचार करुन कुपोषणमुक्त करण्याची योजना अमंलात आणली गेली होती़ हा प्रयोग यशस्वी झाल्याने केंद्राचे विस्तारीकरण करण्यात आले आहे़ या विस्तारीकरणामुळे येथे २५ ते ३० बालकांवर आता उपचार शक्य आहेत़ या विस्तारीकरणाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे़ यासाठी पोषण पुनवर्सन केंद्राची इमारत सजवण्यात आली आहे़
या उपक्रमासोबत राज्यपाल कोश्यारी हे दुर्गम भागातील मुख्य आहार असलेल्या भगर प्रकल्पाची पाहणी करणार आहेत़ मोलगी येथील या प्रकल्पाचीही साफ सफाई सुरु असून पूर्वतयारी जोरात सुरु असल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले़ या भेटीनंतर भगदरी येथे राज्यपाल रवाना होणार असून येथील महूफळी अंगणवाडी केंद्रात ते भेट देऊन पाहणी करणार आहेत़ याच ठिकाणी कुक्कुटपालन व शेळी पालन उपक्रमाला भेटी देऊन ते माहिती घेणार आहेत़
भगदरी येथील पेरु व आंबा लागवड बागांना भेटी देत पाहणी करणार आहेत़ यादरम्यान ते जलयुक्त शिवार व लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यांची पाहणी करणार आहेत़ याठिकाणी माती नाला बांध, सिमेंट बंधारे आणि इतर शेतीपयोगी कामांची पाहणी करुन शेतकºयांसोबत संवाद साधणार आहेत़
या दौºयात पशुसंवर्धन केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही राज्यपाल करणार असल्याने इमारत पूर्णपणे चकाचक झाल्याचे दिसून येत आहे़ भगदरी येथील शासकीय आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर विद्यार्थी त्यांच्यासमोर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असल्याने आश्रमशाळेतही जोरदार सराव सुरु असल्याचे चित्र आहे़ मोलगी येथील विश्रामगृहात त्यांचा मुक्काम राहणार असल्याने विश्रामगृह स्वच्छतेवर बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडून भर देण्यात येत होता़ दोन दिवसांपासून येथे संबधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून आहेत़

Web Title: The governor is pleased to pay a visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.