शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशामुळे इच्छुकांचे देव पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चेला उधान आले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चेला उधान आले होते. सोशल मिडियाद्वारे मेसेजची देवानघेवान होऊन त्यात निवडणुकीलाच स्थगिती मिळाल्याचे सांगितले जात होते. परंतु खरी परिस्थिती आणि न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर या चर्चांना पुर्णविराम मिळाला. तरीही १६ तारखेला न्यायालय काय निर्णय देते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत ५० टक्केच्या आत आरक्षण आणण्यासंदर्भात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने १६ डिसेंबरच्या आत यासंदर्भातील माहिती न्यायालयात सादर करावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यासंदर्भातील मेसेज दुपारी अचानक व्हायरल झाले. अनेकांनी तर थेट निवडणुकीला स्थगिती मिळाल्याचे मेसेज फिरविले. यामुळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीसाठी इच्छूकांमध्ये चलबिचलता निर्माण झाली. नेमके आदेश काय आहेत, खरेच निवडणुकीला स्थगिती मिळाली का? आता निवडणूक कधी होईल? यासह इतर विविध प्रश्न उपस्थित केले जात होते.अनेकांनी राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी आणि वृत्तपत्रांच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर न्यायालयाचे आदेश नेमके काय आहेत याची खात्री झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.धाकधूक कायम१६ तारखेला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. न्यायालयातील दाखल याचिकांवरील सुनावणीची प्रक्रिया सुरू असतांनाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. अनेक पक्षांच्या इच्छुकांच्या मुलाखती होऊन त्यातून छाननी करून नावे अंतिम करण्यापर्यंत काही पक्षांनी तयारी ठेवली आहे. दुसरीकडे इच्छुकांनी प्राथमिक चाचपणी करून भेटीगाठी आणि वातावरण निर्मितीवर खर्च सुरू केला आहे. अशा उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये आता १६ तारखेच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले जाते किंवा कसे, झालेला खर्च वाया जातो का? याबाबतही अनेकांच्या मनातील चलबिचलता कायम आहे.

जिल्हा परिषद निवडणूक आधीच वर्षभर रेंगाळली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपली होती. त्यानंतर तीन महिने मुदतवाढ मिळाली. पुन्हा मुदतवाढ देण्यास शासनाने नकार दिल्यानंतर प्रशासक राज आले. गेल्या आठ महिन्यांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक कामकाज पहात आहेत. आता नवीन वर्षात नवीन अध्यक्ष जिल्हा परिषदेला मिळतील अशी अपेक्षा असतांना मात्र आता न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा निवडणूक प्रक्रिया अधांतरी झाली आहे.