शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

नंदुरबारकरांंची ‘सेस’ मधून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन उड्डाणपुल निर्मितीचा खर्चाच्या वसुलीकरीता नंदुरबारकरांवर लादलेला पेट्रोल व डिझेलवरील लिटरमागे प्रत्येकी एक रुपया ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन उड्डाणपुल निर्मितीचा खर्चाच्या वसुलीकरीता नंदुरबारकरांवर लादलेला पेट्रोल व डिझेलवरील लिटरमागे प्रत्येकी एक रुपया व ९० पैसे अधिभार अर्थात सेसची मुदत संपली आहे़ यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला असून शहरातील पेट्रोलपंपावर नियमित दरातील पेट्रोल-डिझेल मिळण्यास सकाळी सहापासून सुरुवात झाली आहे़शहरातील व शहराबाहेर दोन उड्डाणपुलांना तत्कालीन आघाडी शासनाने आॅगस्ट २००३ मध्ये मंजुरी दिली होती. शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत १६ कोटी ४३ लाख रुपयांचा अंदाजित खर्च दोन्ही उड्डाणपुलांसाठी मंजूर करण्यात आला होता़ परंतू बांधकामासाठी बराच वेळ लागल्याने अंदाजित निधीपेक्षा अधिकचा खर्च झाला होता़ उड्डाणपुलांसाठी मंजूर निधीतच शहरातील दोन्ही उड्डाणपूल, पालिका हद्दीतील रस्ते सुधारणा आणि सार्वजनिक बांधकाम हद्दीतील रस्ते सुधारणा यांचा त्यात समावेश होता. उड्डाणपुलांसाठी अधिक खर्च झाल्याने विकासाच्या इतर योजना बारगळल्या होत्या़रस्ते विकास महामंडळाने २००८ साली पूर्ण केलेल्या उड्डाणपुलांच्या बांधकामाचा खर्च भरून काढण्यासाठी सुरुवातीला सहा ठिकाणी टोलनाके उभारुन वसुली सुरु केली होती़ या वसुलीला बराच विरोध झाल्याने अखेर ते बंद करून त्याऐवजी शासनाकडून शहरात आयात केल्या जाणाऱ्या पेट्रोलवर एक रुपया आणि डिझेलवर ९० पैसे अधिभार लावण्याचा निर्णय घेण्यात येऊन हा अधिभार अर्थात सेस वसुलीची मुदत ही २०१६ पर्यंत ठेवण्यात आली होती़ ही मुदत २०१६ पर्यंत असताना त्याला शासनाकडून वेळावेळी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली़ यावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानपरिषदेत लक्ष्यवेधी मांडून नंदुरबारच्या जनतेला दिलासा देण्याची मागणी केली होती़ शासनाकडून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच सेस वसुली होणार असल्याचे सांगण्यात आले होते़ नव्याने मुदतवाढीची कारवाई न झाल्याने अखेर ३१ डिसेंबर रोजी सेस संपुष्टात आला़ यामुळे उजाडलेल्या नवीन वर्षात नागरिकांना राज्यातील दरांप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेल मिळण्यास सुरुवात झाली आहे़बुधवारी सकाळी सहा वाजेपासून पेट्रोलपंपावर दरांमध्ये बदल झाले़ पेट्रोल प्रतीलिटर ८१ रुपये ४२ पैसे तर डिझेलचे प्रतीलिटर दर हे ७० रुपये ८२ पैसे एवढे आहेत़ सेस नाहीसा झाल्याने प्रती लिटर डिझेलमागे ६० तर डिझेल मागे एक रुपया ७० पैसे कमी झाल्याचे पेट्रोलपंप चालकांकडून सांगण्यात आले आहे़ पेट्रोल-डिझेलच्या बदलत्या दरांमध्ये यापुढे सेसआधारित दर लागू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़शासनाने नंदुरबारातील दोन्ही उड्डाणपुलांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी टोलनाके सुरु केले होते़ शहरातील विविध सहा मार्गांवर हे टोलनाके कार्यान्वित होते़ परंतु टोलवसुलीसंदर्भात नागरिकांनी सातत्याने नाराजी व्यक्त केल्याने शासनाने टोलनाके आवरते घेतले होते़ याऐवजी खर्चवसुली साठी नंदुरबार शहराच्या हद्दीतील सर्व पेट्रोल व डिझेल पंपांवरून विक्री होणाºया पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर लिटरमागे पेट्रोलला एक रुपया आणि डिझेलला ९० पैसे अधिभार लावण्याचे घोषीत करण्यात आले होते. तब्बल १४ वर्षे ही वसुली सुरु होती़ अखेर डिसेंबर २०१९ ला ही वसुली थांबली आहे़