शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

कच:याने अडविली गावक:यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा ते धवळीविहीर रस्त्यावरील हलालपूर गावाजवळील पुलावर कचरा टाकण्यात आल्याने दोन गावांना जोडणारा रस्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा ते धवळीविहीर रस्त्यावरील हलालपूर गावाजवळील पुलावर कचरा टाकण्यात आल्याने दोन गावांना जोडणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे धवळीविहीर येथील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.हलालपूर गावाजवळी नदी पुलाला गेल्या तीन वर्षापासून भले मोठे भगडाद पडले आहे. 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे नदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे या पुलाच्या भगदाडाच्या आकारात वाढ झाली आहे. अश्या परिस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरू पाहात आहे. असे असतांना धवळीविहीर गावाला तालुका व जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा मुख्य रस्ता आहे. धवळीविहीरकरांना या पूल मार्गेच तळोदा ते धवळीविहीर प्रवास करावा लागतो. या पुलावरील वाहतुकीमुळे दिवसेंदिवस या भगदाडाचा आकार वाढत असून, पूल कधी कोसळेल याचा काही नेक नाही. पुलावरील हे भगदाड वाहनधारकांना सहज लक्षात येत नसल्यामुळे या भगदाडामध्ये एखादे वाहन कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.दरम्यान, हलालपूर जवळील पुलावरील वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून चक्क कच:याचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या सुरूवातीलाच मधोमध कच:याचा ढीग करण्यात आला आहे. या कच:याच्या ढिगा:यामुळे धवळीविहीरकडे जाणारी वाहतूक रविवारी व सोमवारी पूर्णपणे बंद झाली होती. काही दुचाकीधारक तारेवरची कसरत करीत या ढिगा:यावरून दुचाकी काढतांना दिसून आले तर काही वाहधारकांनी ढिगा:याच्या एका बाजूचा कचरा सरकवून दुचाकी निघेल एवढा रस्ता तयार केला आहे. या मार्गावरुन चारचाकी वाहन निघणे अशक्य आहे. एका कार चालकाने या ढिगा:या वरून आपली गाडी काढण्याच्या प्रय} केला असता त्याची गाडी कच:याच्या ढिगा:याच्या मधोमध फसली होती. दरम्यान, या वाहनधारकाने ब:याच वेळा प्रय} केल्याने त्याची कार निघाल्याचे सांगण्यात येते.दरम्यान, हा कचरा तळोदा नगरपरिषदेच्या गाडीतून टाकण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. मात्र हा कचरा पुलवरील भगदाडमध्ये टाकण्यासाठी किंवा पुलावरील भगदाड वाहनधारकांच्या लक्षात यावे यासाठी भगदाडजवळ टाकण्यात आला असावा, असे प्रत्यक्षदर्श्ीचे म्हणणे आहे. परंतु तो कचरा रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आल्याने निर्माण झालेल्या ढिगा:यामुळे वाहतूक अडविली गेली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या ढिगा:यावरून वाहने जात असल्याने काही प्रमाणात तो कचरा दाबला गेल्याने त्यावरून वाहने काढणे थोडे सोपे झाले आहे.धवळीविहीर हे गाव तालुक्यातील सर्वाधीक आदिवासी लोकसंख्येचे गांव आहे. तळोद्यापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे गाव वसले असूनदेखील गावात अनेक सोयी-सुविधाचा अभाव आहे. अश्या परिस्थिती गावाला तालुका व जिल्हा मुख्यालयाशी जोडणा:या मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने रात्री-अपरात्री आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान, हलालपूर ते धवळीविहीरला जोडणा:या पुलाला गेल्या तीन वर्षापासून भगदाड पडले आहे. हे भगदाड अत्यंत जीवघेण्या स्वरूपाचे असून, अनेकांना या भगदाडमुळे जायबंदी देखील व्हावे लागले आहे. हा पूल पूर्णपणे कोसळल्यावर प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का? असा संतप्त प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे तळोदा ते हलालपूर दरम्यान असलेल्या मार्गाचीदेखील मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

भगदाडमध्ये वाहन कोसळून अपघात होऊ नये, यासाठी वाहनधारकांचे लक्ष वेधण्याकरीता किंवा भगदाडामध्ये टाकण्यासाठी तळोदा शहरातून गोळा होणा:या कच:याचा वापर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. धोकेदायक बनत असलेल्या या पुलावरील वाहतूक रोखण्यासाठी टाकाऊ व दरुगधीयुक्त कच:याचा वापर करावा, अशी कल्पना नेमकी कोणाला सूचली याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. पुलाजवळील रस्त्यावर टाकण्यात आलेला कचरा हा हलालपूर गावापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना या कच:यापासून उत्पन्न होणा:या दरुगधीचा सामना करावा लागत आहे. या कच:यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.