खापर येथील बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST2021-05-04T04:13:23+5:302021-05-04T04:13:23+5:30

खापर गाव व परिसरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून, आतापावेतो अनेकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ...

The fuss of social distance in the market at Khapar | खापर येथील बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

खापर येथील बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

खापर गाव व परिसरात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून, आतापावेतो अनेकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्यानंतर यात केवळ जीवनाश्यक वस्तूंच्या विक्रीला सूट दिली असताना खापर गावातील सर्वच व्यवसाय सुरळीत सुरू होते. आतादेखील गावात सर्वच व्यवसाय सुरू असून, व्यावसायिकांना व ग्राहकांना लॉकडाऊनचा विसर पडला असून, पोलीस यंत्रणेचा वचक नसल्याने व्यावसायिक मनमानी करीत असल्याचे चित्र आहे.

येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून मोकळे होतात व त्यानंतर मात्र बाजारपेठे फिरकतदेखील नाहीत. वास्तविक सकाळी ११ वाजेपावेतो बाजार असताना येथे स्थानिक पोलीस कर्मचारी थांबून राहिल्यास बाजारपेठेत गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही. पण संबंधित कर्मचारी सध्या बाजारपेठेत फिरकतसुद्धा नसून सर्वत्र आलबेल आहे. येथील बाजारपेठेत सर्वच मिळत असल्याने परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिक प्रचंड गर्दी करीत आहेत व शासनाच्या लॉकडाऊनला हरताळ फासत असल्याचे चित्र खापर येथे दिसून येत आहे.

Web Title: The fuss of social distance in the market at Khapar