शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलक सिताबाई तडवी यांच्यावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या  सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाला होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या  सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी अंबाबारी ता.अक्कलकुवा आणल्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंबाबारी येथे शेकडोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. ग्रामस्थांनी दिवसभर चुली बंद ठेवून सिताबाईंना श्रध्दांजली वाहिली. सीताबाई ह्या  विस्थापितांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी लढत होत्या. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. अंत्ययात्रेत लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, माजीमंत्री पद्माकर वळवी यांच्यासह जिल्हाभरातून नागरीक सहभागी झाले होते.  दिल्ली येथे केंद्रशासनाच्या शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या दोन महिनंपासून शेतकरीच आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लोक संघर्ष मोर्चाचे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. याच आंदोलनात आंबाबारी सीताबाई रामदास तडवी लोकसंघर्षतर्फे सहभागी होत्या. त्या कार्यकर्त्यांसह  शाहजहाँपुर बॉर्डर वर आंदोलन करीत होत्या.  प्रजासत्ताक दिनी झालेल्या परेडमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. परेड संपल्यानंतर त्या कार्यकर्त्यांसोबत  गावाकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. त्यातच रेल्वे स्थानकावर येताना त्यांचा अचानक मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री विशेष रुग्णवाहिकेने त्यांचा मृतदेह अक्कलकुवा तालुक्याकडे रवाना करण्यात आला होता.  त्यांचा मृतदेह  शुक्रवारी सकाळी अंबाबारी येथे आणल्यानंतर गावातील स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  सीताबाई  यांच्या अचानक निधनाने ग्रामस्थांनी एक दिवसाचा उपवास करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.  सीताबाई यांच्या पश्चात पती, मुलगा व चार मुली असा परिवार आहे.

विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली 

  • मयत सीताबाई यांना विधानसभेच्या उपाध्यक्ष निलम गो-हे यांनीही पाठवलेल्या श्रद्धांजली अर्पण करत त्यांचे बलिदान वाया जाणार नसल्याचे म्हटले आहे. 
  •  सीताबाई यांना देशभसह सयूंक्त किसान मोर्चा अखील भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनांची संघर्ष समिती महाराष्ट्र आणि विविध राज्यातील किसान संघटनांकडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली. कांग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजू शेट्टी, पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, गजानन खातू पूर्णिमा, चिकरमाने सुभाष वारे यांनीही शोकसंदेश दिले होते. राज्यातील विविध भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही शोक संदेश पाठवले होते.