शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नर्मदा विकास कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पासंदर्भात पुनर्वसन उपदलाच्या गेल्या चार महिन्यात किती बैठका झाल्या यासह प्रशासनाने केलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पासंदर्भात पुनर्वसन उपदलाच्या गेल्या चार महिन्यात किती बैठका झाल्या यासह प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मिळावी यासाठी मंगळवारी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकत्र्यानी प्रकल्पग्रस्तांसह नर्मदा विकास विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, आंदोलनकत्र्याना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आंदोलनाच्या कार्यकत्र्या लतीका राजपूत, चेतन साळवे, नुरजी वसावे, पुन्या वसावे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्तांनी नर्मदा विकास विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात पुनर्वसन उपदलाच्या बैठकीतील माहिती मिळावी, आपत्ती व्यवस्थापन आराखडा मिळावा, धरणाच्या 138.68 मीटर उंचीवर किती कुटुंब बुडिताखाली येणार आहेत, किती कुटुंब राहतात याची माहिती मिळावी, तात्पुरत्या स्थलांतरासाठी केलेल्या खर्चाची माहिती मिळावी यासह विविध नऊ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर कार्यकारी अभियंता गावीत यांनी काही मुद्यांवर लेखी माहिती दिली. तथापि, अनेक मुद्यांवर माहिती मिळाली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर लतिका राजपूत, चेतन साळवे, ओरसिंग पटले, पुन्या वसावे, किर्ता वसावे, नुरजी वसावे, नाथ्या पावरा, मांगल्या पावरा, कृष्णा पावरा, गंभीर पाडवी, धरमसिंग वसावे, लालसिंग वसावे, शामसिंग पाडवी, सायसिंग पाडवी आदींच्या सह्या आहेत.