शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेजमधील टायरांना आग लागून दुसरूस्तीला आलेली चार वाहने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महामार्गावर स्वस्तिक पेट्रोल पम्प जवळील गॅरेज मधील वाहन आणि टायरला भल्या सकाळी आग लागुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महामार्गावर स्वस्तिक पेट्रोल पम्प जवळील गॅरेज मधील वाहन आणि टायरला भल्या सकाळी आग लागुन लाखोचे नुकसान झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना शनिवारी घडली.नवापूर शहरात महामार्ग लगत असलेल्या स्वस्तिक पेट्रोल पम्पाजवळील टायर दुकानात विक्रीला असलेल्या जुने टायरांना सकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. टायरांना लागलेल्या आगी मुळे जवळच असलेल्या गॅरेजमधे दुरुस्तीसाठी आलेल्या चार वाहनांनी क्रमाक्रमाने पेट घेतला. त्यात चारही वाहने जळून खाक झालीत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. सकाळी व्यायामाच्या इराद्याने फिरणारे नागरिक व परिसरातील नागरिकांनी वेळीच धाव घेउन आगीवर नियंत्रण मिळवले. जवळच पेट्रोल पम्प असल्याने मोठा अनर्थ टळला.नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका चारचाकी वाहनाचे काच फोडून ते वाहन बाजूला करून आगीपासून वाचवण्यात नागरिक यशस्वी झाले. नागरिकांनी पालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यासाठी पालिकेच्या टोल फ्री क्रमांक व पंपहाऊस वरील क्रमांक लावले असता दोन्ही क्रमांक बंद मिळुन आल्याने नागरिकांनी अग्निशामक वाहन येईस्तव मिळेल त्या साधनांचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक बम्ब वेळेवर उपलब्ध झाला असता तर नुकसानाची तिव्रता कमी झाली असती असा सुर नागरिकांमधुन व्यक्त झाला. सामाजिक कार्यकर्ते विजय सैन यांनी अग्निशामक वाहनाच्या चालकाच्या खाजगी मोबाईल वर संपर्क करून वाहन बोलावल्याने अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आली. तोवर चार वाहन आणि विक्री साठी असलेले टायर जळून खाक झाल्याने पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीचे कारण समजू शकले नसले तरी प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार कडाक्याच्या थंडी पासून बचाव करण्यासाठी लावलेल्या शेकोटीमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नवापुर पोलीसात अग्नि उपद्रवाची नोंद घेण्यात आली आहे.