मंजूर रस्त्यांना वनविभागाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:11 PM2019-09-17T12:11:27+5:302019-09-17T12:12:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरिकांच्या सुविधेसाठी शासनामार्फत रस्ते मंजूर करण्यात आले, परंतु या रस्त्यांच्या कामाला वनविभागाने परवानगीच दिली ...

Forestry barrier to approved roads | मंजूर रस्त्यांना वनविभागाचा अडथळा

मंजूर रस्त्यांना वनविभागाचा अडथळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नागरिकांच्या सुविधेसाठी शासनामार्फत रस्ते मंजूर करण्यात आले, परंतु या रस्त्यांच्या कामाला वनविभागाने परवानगीच दिली नसल्याचे शहादा तालुक्यातील उमरापाणी, हा:यापाडा, कंजापाणी व उकलापाणी येथील नागरिकांनी सांजितले. रस्तेच नसल्यामुळे तेथे इतर सुविधाचाही अभाव असून याबाबत पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय तेथील नागरिकांनी घेतला आहे. 
नागङिारी ता.शहादा गृप ग्रामपंचायत उमरापाणी, हा:यापाडा, कंजापाणी व उकलापाणी या गावांर्पयत कुठलेही रस्ते पोहोचले नाही. या चारही गावांमध्ये नागरिकांचे वास्तव्य असल्याने त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनामार्फत रस्ते मंजूर करण्यात आले. परंतु या मंजूर रस्त्यांच्या कामाला वन विभागाने परवानगीच दिली नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. रस्तेच नसल्यामुळे चारही गावांमध्ये इतर सुविधांचा देखील अभाव असून गैरसोयीला तेथील नागरिक बळी पडत असल्याचे सांगण्यात आले. रस्ते कामांना परवानगी मिळावी यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला परंतु दखल घेतली जात नाही. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय तेथील नागरिकांनी घेतला होता. पावसाळ्यात सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने यावर चर्चा करण्यासाठी अंतर्गत बैठक घेऊन पुन्हा शासनाकडे मागणी करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. 
 

Web Title: Forestry barrier to approved roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.