शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कमाल आणि किमान तापमान कमी होऊन कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस ...

स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कमाल आणि किमान

तापमान कमी होऊन कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान ढगाळ राहील. शेतकरी बांधवांनी पेरणीयोग्य ७५ ते १०० मिमी एवढा पुरेसा पाऊस झाल्यानंतर तसेच ४ ते ५ इंच एवढी ओल झाल्यास व वाफसा आल्यानंतर खरीप पिकांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. शेतात काम करताना आपल्या भागात पडणाऱ्या विजांपासून संरक्षणासाठी आणि

पूर्वसूचना मिळवण्यासाठी प्ले स्टोर मधून “दामिनी” ॲप डाऊनलोड करावे असे आवाहन

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राने केले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात दोन दिवसांपासून अनेक भागात तुरळक ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. पावसाचे प्रमाण सर्वच भागात सारखे नाही. शिवाय अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने पेरण्यांना सुरुवात नाही. अवघ्या १४ हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पावणेतीन लाख हेक्टर इतके आहे. खरिपाच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत करणे योग्य असते. तरच पिकांची उत्पादकता व उत्पादन चांगले येते. परंतु यंदा १० जुलैपर्यंत देखील पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने १५ जुलैपर्यंत पेरण्या होणे शक्य नाही. त्यामुळे यंदा पेरण्या लांबणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कमी कालावधीच्या पिकामुळे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस झालेला आहे. काही तालुक्यात बऱ्यापैकी तर काही तालुक्यात अगदीच कमी पाऊस झाला असल्याने पावसाचा असमतोल देखील कायम आहे. गेल्यावर्षी १० जुलैपर्यंत सरासरीच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला होता. अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस झाला असल्याचे चित्र आहे.